शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

‘इसीस’कडून ब्रिटिश नागरिकाचा शिरच्छेद

By admin | Updated: September 15, 2014 04:32 IST

इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅण्ड सिरियाच्या (इसीस) दहशतवाद्यांनी ब्रिटनच्या मदत पथकातील कार्यकर्त्याचा शिरच्छेद केला असून पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांनी रविवारी हे कृत्य ‘निव्वळ दुष्ट’ असल्याचे म्हटले

लंडन : इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅण्ड सिरियाच्या (इसीस) दहशतवाद्यांनी ब्रिटनच्या मदत पथकातील कार्यकर्त्याचा शिरच्छेद केला असून पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांनी रविवारी हे कृत्य ‘निव्वळ दुष्ट’ असल्याचे म्हटले. डेव्हिड हैनिस (४४) यांचा दहशतवादी शिरच्छेद करीत असल्याचा व्हिडिओ इस्लामिक स्टेटने जारी केल्यानंतर कॅमेरून यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.हा व्हिडिओ खराच असल्याची खातरजमा ब्रिटन करीत असून कॅमेरून यांनी मारेकऱ्यांना पकडण्यासाठी सर्व काही केले जाईल, असे सांगितले. ही हत्या झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिका इंग्लंडच्या खांद्याला खांदा लावून काम करील, असे सांगितले. हैनिस यांना २०१३ मध्ये सिरियात इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी ताब्यात घेतले होते. आयएसच्या दहशतवाद्यांनी या आधीच अमेरिकेच्या दोन पत्रकारांचा शिरच्छेद केलेला आहे. हैनिस यांच्या शिरच्छेदाच्या व्हिडिओमध्येही दहशतवाद्यांनी त्यांच्या ताब्यात असलेल्या आणखी एका ब्रिटिशाची हत्या करण्याची धमकी दिली आहे. हैनिस यांचा चेहरा झाकलेल्या मारेकऱ्याकडून शिरच्छेद होत असलेल्या या २ मिनिटे व २७ सेकंदांच्या व्हिडिओचा मथळा ‘अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांना संदेश’ असा आहे. इस्लामिक स्टेटला नष्ट करण्यासाठी अमेरिकेने सुरू केलेल्या प्रयत्नांत ब्रिटनची साथ आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी कितीही वेळ लागला तरी आम्ही पकडू, असे कॅमेरून म्हणाले. हैनिस यांच्या कुटुंबियांनी त्यांची नेहमीच उणीव भासेल, असे म्हटले. आॅस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अ‍ॅबोट यांनी विशिष्ट दहशतवादी गट केवळ वाईट कृत्यच करतो असे नाही तर ते करताना आनंदही घेतो, असे म्हटले. इसीसने इराकचे ५ ते ६ दशलक्ष लोकसंख्येचा भूभाग ताब्यात घेतला आहे. (वृत्तसंस्था)