शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीला भेटण्यासाठी विमानाचे अपहरण

By admin | Updated: March 30, 2016 02:34 IST

वेगळे राहणाऱ्या प्रेयसीच्या भेटीसाठी इजिप्त एअरच्या विमानाचे अपहरण करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. तत्पूर्वी, या विमानातील सगळ्या प्रवाशांची सुखरूप सुटका झाली

निकोसिया : वेगळे राहणाऱ्या प्रेयसीच्या भेटीसाठी इजिप्त एअरच्या विमानाचे अपहरण करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. तत्पूर्वी, या विमानातील सगळ्या प्रवाशांची सुखरूप सुटका झाली होती, असे अधिकृत सूत्रांनी मंगळवारी सांगितले. विमानातून एक व्यक्ती बाहेर येऊन नंतर ती धावपट्टीवर चालत आली. ती दहशतवादविरोधी पोलीस अधिकाऱ्यांच्या दिशेने हात वर करून येत होती, असे एएफपीच्या वार्ताहराने म्हटले. अधिकाऱ्यांनी त्याला जमिनीवर बसवले व दूर घेऊन जायच्या आधी दोन मिनिटे त्याची त्यांनी झडती घेतली. तो शरण आल्यानंतर अर्ध्या तासाने पोलीस विमानात गेले. अपहरणाची ही घटना दहशतवादाशी संबंधित नसल्याचा खुलासा सरकारने केला असून अपहरण केलेल्या व्यक्तीने त्याच्यापासून वेगळे राहणाऱ्या त्याच्या प्रेयसीला भेटायची मागणी केली होती. ही प्रेयसी सायप्रसची असून ती या बेटावर राहते. द इजिप्त एअरचे एअरबस ए-३२० विमान येथील तळावर सकाळी ८.५० वाजता (स्थानिक वेळ) उतरविले गेले. त्याआधी २० मिनिटे अपहरणकर्त्याने विमानाचा मार्ग बदलण्यासाठी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला होता. अलेक्झांड्रियाहून कैरोला निघालेल्या या विमानात त्याने कमरेला बांधलेल्या स्फोटकांच्या पट्ट्यांचा स्फोट घडविण्याची धमकी दिली होती, असे इजिप्तच्या नागरी उड्डयन विभागाने सांगितले. इजिप्तचे उड्डयन खात्याचे मंत्री शेरीफ फॅथी यांनी प्रत्रकार परिषदेत बोलताना विमानाचा कॅप्टन, सहचालक, हवाई सुंदरी आणि सुरक्षा सैनिक तीन प्रवाशांसह विमानातच होते, असे सांगितले होते. अपहरणकर्त्याशी झालेल्या वाटाघाटीतून चार विदेशी प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना वगळून सगळ्या प्रवाशांची सुटका झाली. विमानात आठ अमेरिकन, चार डच, चार ब्रिटिश आणि एक फ्रेंच यांच्यासह २१ विदेशी प्रवासी होते. अपहरणकर्ता इजिप्शीयन आहे. (वृत्तसंस्था)सायप्रसच्या सिग्मा टेलिव्हिजनने दिलेल्या वृत्तानुसार त्या प्रेयसीला तिच्या ओरोकलिनी खेड्यातील घरून विमानतळावर आणण्यात आले. तिच्यासोबत लहान मूलही होते. सायप्रसच्या सरकारी रेडिओने अपहरणकर्त्याने आश्रय मागितल्याचे व दुभाषाची मागणी केल्याचे वृत्त दिले होते. संकटप्रसंगाला तोंड देण्यासाठी विमानतळावर मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते.