शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पाकमधील चित्रपट व्यवसायाचे ७० टक्के नुकसान

By admin | Updated: September 29, 2016 00:30 IST

रीतील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावपूर्ण झाले आहेत. हे संबंध बिघडल्यास आणि हिंदी चित्रपटावर बंदी आल्यास पाकिस्तानातील चित्रपट

लाहोर : उरीतील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावपूर्ण झाले आहेत. हे संबंध बिघडल्यास आणि हिंदी चित्रपटावर बंदी आल्यास पाकिस्तानातील चित्रपट व्यवसायाचे ७० टक्के नुकसान होऊ शकते, असा अंदाज व्यक्त होत आहे. भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग ढोणी याच्या जीवनावरील शुक्रवारी प्रदर्शित होणारा चित्रपटही पाकिस्तानात न दाखविण्याचा निर्णय तेथील वितरकांनी घेतला आहे.चित्रपट व्यावसायिकांना अशी भीती आहे की, परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर भारतीय चित्रपटावर येथे बंदीची मागणी होऊ शकते. एक वितरक सिनेप्लेक्सचे मालक नदीम मंडविवल्ला यांनी सांगितले की, मी निराशावादी नाही; पण वस्तुस्थिती ही आहे की, गत काही वर्षांत हिंदी आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट प्रदर्शित झाल्याने पाकिस्तानच्या चित्रपट व्यवसायाला एक उंची मिळाली आहे. मी एवढीच अपेक्षा करतो की, दीर्घ काळासाठी हा तणाव राहायला नको. काही काळापुरते प्रतिबंध लावले तर आमच्यावर त्याचा परिणाम होणार नाही; पण दीर्घ काळासाठी जर प्रतिबंध लावले, तर अनेक टॉकीज आणि मल्टीप्लेक्स बंद पडतील. चित्रपट समीक्षक उमर अलवी यांनी सांगितले की, सिनेमा टॉकीज आणि महसूल वाढल्याने पाकिस्तानातील चित्रपट उद्योगाने कात टाकली आहे. हा व्यवसाय चांगला चालण्यासाठी वर्षातून किमान ५० ते ६० चित्रपट तयार व्हायला हवेत; पण एवढ्या चित्रपटांची येथे निर्मिती होत नाही.(वृत्तसंस्था)सलमान खानची मध्यस्थीदिग्दर्शक-निर्माता करण जोहर यांच्या आगामी चित्रपटात पाक कलावतं असल्याच्या कारणास्तव न मुंबई व महाराष्ट्रात प्रदर्शित न होउ देण्याची धमकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिल्यानंतर अभिनेता सलमान खान याने त्या वादात मध्यस्थी करण्याचे ठरविले आहे. सलमान खान स्वत: राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले. मनसेने पाक कलावंतांवर बंदी घालण्याची घोषणा करण्याआधी आधी हा चित्रपट तयार झाला असल्याने तो प्रदर्शित होण्यात अडथळे आणू नये, अशी भूमिका तो मांडणार असल्याचे कळते.तो निर्णय केंद्र सरकारने घ्यावा - सैफ अली खानभारतीय चित्रपटांत पाकिस्तानी कलाकार असावेत का किंवा पाकिस्तानी कलावंतांचे कार्यक्रम भारतात व्हावेत का, याचा निर्णय केंद्र सरकारने घ्यावा, असे अभिनेता सैफ अली खानने म्हटले आहे. सरकार जो निर्णय घेईल, तो सारेच मान्य करतील असे सांगून तो म्हणाला की, या प्रश्नाबाबत सतत उलटसुलट चर्चा होत असते. त्यावर एकच कायमस्वरूपी निर्णय सरकारने घेतल्यास वाद निर्माण हेणार नाहीत.