शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

एकाच झाडाला ४० प्रकारची फळे

By admin | Updated: July 26, 2015 23:35 IST

भारतीय पुराणातील कल्पवृक्ष असो की ज्यू पुराणातील कबाला, ख्रिश्चन धर्मातील यू व बुद्ध धर्मातील बोधीवृक्ष विविध पुराणांत वा प्राचीन कथांत

वॉशिंग्टन : भारतीय पुराणातील कल्पवृक्ष असो की ज्यू पुराणातील कबाला, ख्रिश्चन धर्मातील यू व बुद्ध धर्मातील बोधीवृक्ष विविध पुराणांत वा प्राचीन कथांत आलेली विद्वत्तेच्या वृक्षाची ही नावे, असा वृक्ष कधी अस्तित्वात असेल याची कल्पनाही कोणी केली नसेल; पण संपत्ती, समृद्धी व ज्ञान यांचे प्रतीक ठरलेला एक वृक्ष अमेरिकेत जोपासण्यात आला असून ट्री आॅफ ४० असे त्याचे नाव आहे. सॅम वान अकेन या प्राध्यापक व सुशिक्षित शेतकऱ्याने हा वृक्ष जोपासला आहे. सिराकस विद्यापीठात प्राध्यापक व स्वयंघोषित शेतकरी अशी अकेन यांची ओळख आहे. त्यांनी तयार केलेला हा वृक्ष एकाचवेळी ४० प्रकारची फळे देतो असा त्यांचा दावा आहे. प्लम, पीच, अ‍ॅप्रिकॉट, चेरी, नेक्ट्रीन अशी फळे या वृक्षावर लगडतात. प्राध्यापक व्हान अ‍ॅकेन यांनी या वृक्षाचे नाव ट्री आॅफ ४० असे ठेवले आहे. बायबलमध्ये ४० हा आकडा समृद्धीचे प्रतीक म्हणून आला आहे. म्हणून अ‍ॅकेन यांनी या वृक्षाचे नाव ट्री आॅफ ४० असे ठेवले आहे. त्यांच्या दृष्टीने शास्त्रीय प्रयोगापेक्षा ही एक कला आहे. ट्री ४० लावून काही वर्षे झाली आहेत आणि अशा प्रकारचे किमान १२ वृक्ष अमेरिकेत आहेत; पण प्रा. अ‍ॅकेन यांनी आपल्या ट्री ४० ची गोष्ट न्यू नॅशनल जिआॅग्राफिकवर चित्रफितीच्या माध्यमातून सादर केली असून, त्यामुळे या प्रयोगाला नवा उजाळा मिळाला आहे. त्यांच्या या वृक्षावर वेगवेगळी फळे वेगवेगळ्या वेळी फळतात, संपूर्ण उन्हाळाभर हे चक्र चालू असते; पण एकाचवेळी सर्व फळे दिसली तर मग खराच आश्चर्यजनक प्रयोग होईल, असे अ‍ॅकेन म्हणतात. अ‍ॅकेन यांना असा वृक्ष तयार करून देण्यासाठी मागण्याही येत असून, एका वृक्षाची किंमत ३० हजार डॉलर आहे.