शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

चहा टपरी चालविणाऱ्या महिलांचा साडीचोळी देऊन केला सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:13 IST

आखाडा बाळापूर : येथील चहाची टपरी चालविणाऱ्या दोन महिलांना येथील रमा गोपाल अग्रवाल व त्यांच्या परिवाराने साडीचोळी, पुष्पगुच्छ देऊन ...

आखाडा बाळापूर : येथील चहाची टपरी चालविणाऱ्या दोन महिलांना येथील रमा गोपाल अग्रवाल व त्यांच्या परिवाराने साडीचोळी, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले आहे.

आखाडा बाळापूर येथील नांदेड- हिंगोली महामार्गावरील पोलीस ठाण्याच्या समोरच चहाची टपरी आहे. पतीला मदत म्हणून पुढे आलेल्या महिलांनी हा व्यवसाय स्वतंत्रपणे सांभाळला आहे. पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळ चहाची टपरी चालविणाऱ्या सविता कोरडे व मराठवाडा चौक परिसरातील अश्विनी चव्हाण या दोन महिलांचा अग्रवाल परिवाराच्या वतीने साडीचोळी, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

महिला व्यवसायात पाय रोवून उभ्या राहत आहेत. शिवाय काम करीत असताना लाज न बाळगता पुरुषांच्या बरोबरीने आपण काम करू शकतो हे या महिलांनी दाखवून दिले आहे. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने त्या चहाची टपरी चालवितात व आपला कुटुंबाचा गाडा हाकतात. त्यांच्या श्रमाचा सन्मान करण्यासाठी अग्रवाल या व्यावसायिकाने पुढाकार घेतला. रमा गोपाल अग्रवाल यांच्या हस्ते आज त्यांच्या चहा टपरीवर जाऊन अश्विनी चव्हाण व सविता कोरडे या दोन उद्योगी महिलांचा साडी-चोळी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी गोपाल अग्रवाल, कृष्णा अग्रवाल, गजानन कदम, संजय भिसे उपस्थित होते. फाेटाे नं ३०