शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यातील गट-तटांचे वारे वाहतेय हिंगोलीतही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:27 IST

यावेळी परभणी जिल्ह्यात आ. सुरेश वरपूडकर व माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांचे वेगवेगळे गट पडले आहेत. त्यामुळे हिंगोलीतही त्यानुसार ...

यावेळी परभणी जिल्ह्यात आ. सुरेश वरपूडकर व माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांचे वेगवेगळे गट पडले आहेत. त्यामुळे हिंगोलीतही त्यानुसार गट पडत आहेत. दोन पॅनलमध्ये लढतीची चिन्हे असल्याने दोन्हींपैकी एका गटात संधीसाठी प्रयत्न होत आहेत. कळमनुरीतून सुरेश वडगावकर पुन्हा तयारी करीत असून त्यांनी काँग्रेस व शिवसेना या दोन्ही डगरीवर हात ठेवला. वरपूडकर गटाकडून ते जाण्याची शक्यता आहे. तर माजी खा. शिवाजी माने यामुळे सेनेवर नाराज झाले असून ते विरोधी गटाकडून जातील, अशी शक्यता आहे. हिंगोलीत आ. तान्हाजी मुटकुळे हे साहजिकच बोर्डीकर गटाकडून असून विरोधी गट दत्तराव कडतीकर यांना रिंगणात आणण्याच्या तयारीत आहे. सेनगावात माजी आ. साहेबराव पाटील यांना आव्हान देण्यासाठी राजेंद्र देशमुख हे तयारी करताना दिसत आहेत.

सर्वांत जास्त इच्छुक औंढ्यात आहेत. येथे विद्ममान बाबा नाईक यांना शह देण्यासाठी बोर्डीकर गटाकडून राजेश पाटील गोरेगावकर रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. तर अपक्ष वेणूताई तातेराव आहेर व जि.प. उपाध्यक्ष मनीष आखरेही तयारीत आहेत. मात्र, आखरे इतर मागासमध्येही नशीब अजमावण्याची तयारी करीत आहेत. तर रूपाली पाटील पुन्हा महिलांमधून रिंगणात राहतील, असे दिसते. गोरेगावकर यांच्या कुटुंबातीलच तीन उमेदवार होण्याची शक्यता असून दोन वेगवेगळ्या गटात राहण्याची शक्यता आहे. वसमतमध्ये अंबादास भोसले यांना राष्ट्रवादीतूनच शह देण्याचा प्रयत्न चालल्याच्या वावड्या उठत होत्या. मात्र, आ. राजू नवघरे यांना यात फारसा रस दिसत नाही. एकंदर मध्यवर्ती बँकेमुळे काही पक्षांना अंतर्गत गटबाजीला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.