शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात नियमांचे उल्लंघन ; बेशिस्त चालकांना पावणेतीन कोटींचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:20 IST

हिंगोली : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन चहूबाजूंनी प्रयत्न करीत असताना काही वाहनचालक मात्र बिनबोभाट रस्त्यावर वावरत होते. अशा बेशिस्त ...

हिंगोली : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन चहूबाजूंनी प्रयत्न करीत असताना काही वाहनचालक मात्र बिनबोभाट रस्त्यावर वावरत होते. अशा बेशिस्त वाहनचालकांना वाहतूक शाखेने दीड वर्षात पावणेतीन कोटींचा दंड ठोठावला. यापैकी २०२० मध्ये ५ हजार २७६ वाहनचालकांकडून २१ लाख ५२ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल झाला आहे.

जिल्ह्यात मागील दीड वर्षापासून थैमान घातलेल्या कोरोना रुग्णांची संख्या आता कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मागील तीन महिन्यांपासून ठप्प पडलेली बाजारपेठ पुन्हा गजबजली आहे. त्यामुळे नागरिक घराबाहेर खरेदीसाठी पडत आहेत. गतवर्षीही पाच ते सहा महिने व्यवहार ठप्प होते. त्यानंतर बाजारपेठेतील निर्बंध शिथिल करण्यात आले होते. एकीकडे रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रशासनाने काही निर्बंध घातले होते. तर दुसरीकडे कोरोना काळात मोठ्या संख्येने वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत होते. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पोलीस प्रशासनाने बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. तरीही काही चलाख वाहनचालक पोलिसांना चकमा देत फिरत होते. ही बाब निदर्शनास आल्याने वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाई सुरू केली होती. मागील दीड वर्षात नो पार्किंग, धोकादायक वाहन चालविणे, ट्रीपल शिट, विनापरवाना, मोबाइलवर बोलणे, अधिक वेगाने वाहन चालविणे, फॅन्सी नंबरप्लेट आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५० हजार ५२१ वाहनचालकांवर कारवाई करीत त्यांना २ कोटी ८७ लाख ९८ हजार ६०० रुपयांचा दंड लावण्यात आला आहे. यात २०२१ मध्ये १३ हजार ३५६ वाहनचालकांवरील ६७ लाख १० हजार ४०० रुपये दंडाचा समावेश आहे.

वेगाने वाहन चालविणाऱ्यांना सर्वाधिक दंड

मागील दीड वर्षातील कोरोना काळात वेगाने वाहने चालविल्याप्रकरणी ९ हजार ६७ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी वाहतूक शाखेने २०२० मध्ये ५१ लाख १९ हजारांचा तर २०२१ मध्ये ३९ लाख ६८ हजारांचा दंड लावला आहे.

दंड भरण्याकडे मात्र कानाडोळा

वाहतुकीचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येते, मात्र बहुतांश वाहनमालक दंड भरण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. २०२० मध्ये वर्षभरात ३७ हजार १६५ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यापैकी ५ हजार २७६ वाहनचालकांकडून २१ लाख ५२ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल झाला आहे. २०२१ मध्येही बहुतांश वाहनचालकांनी अद्याप दंड भरलेला नाही.

कोरोना काळातील दीड वर्षातील कारवाई

नो पार्किंग - २२७९९

धोकादायक वाहन चालविणे - ४८१३

ट्रीपल शिट - ३९३२

विनापरवाना - ८०५९

मोबाइलवर बोलणे -१६६२

अधिक वेग - ९०८७

फॅन्सी नंबर प्लेट - १६९

फोटो :