क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका, हिंगोली
हिंगोली : शहरातील यशवंत नगर येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकेत रविवार, ३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला नंदकुमार दिंडे, आरती लेकुळे, प्रा. सुरेश लेकुळे, राहुल हराळ, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
ग्रामपंचायत कार्यालय, संतुक पिंपरी
संतुक पिंपरी : हिंगोली तालुक्यातील संतुक पिंपरी ग्रामपंचायत कार्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच मीरा मुकाडे, कौसाबाई नेमाने, सखाराम केशवे, नागेश बाेराटे, नामदेव पुरी, प्रभुजी खांडेकर, पांडुरंग मुकाडे, विजय पुरी, मुंजाजी ढगे, विलास खांडेकर, प्रल्हाद मुकाडे, अभिमान पुरी, शोभा तुडसे, पल्लवी हरणे, ओमप्रकाश बशिने, नागेश बोराटे, प्रल्हाद मुकाडे, राजू गिरी उपस्थित होते.
ग्रामपंचायत कार्यालय, लिंबाळा मक्ता
संतुक पिंपरी : हिंगोली तालुक्यातील लिंबाळा मक्ता ग्रामपंचायत कार्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मीना चव्हाण, अकबरखॉ पठाण, सरवरबी शेख अहेमद, साजेदा लतीफ, जुबेदाबी भुरेखॉ, प्रभाकर इंगोले, शमू शेख फरीद, बिस्मीलाबी पठाण, संगीता खडसे, अन्वरखॉ पठाण उपस्थित होते.