शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

चारा विकत घेऊन जनावरांचे पोट भरणारी उमाबाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:13 IST

मागील दोन-तीन महिन्यांपासून कोरोनाचे रूग्ण वाढू लागल्याचे पाहून शासनाने संचारबंदी लागू केली आहे. तरीही उमाबाई रोज सकाळी आठ वाजता ...

मागील दोन-तीन महिन्यांपासून कोरोनाचे रूग्ण वाढू लागल्याचे पाहून शासनाने संचारबंदी लागू केली आहे. तरीही उमाबाई रोज सकाळी आठ वाजता अकलोला रोडवर चारा विकत घेऊन बसलेली असते. ७० वर्षांच्या उमाबाईला बोलते केले असता ती म्हणाली, माणसाला कोणीही भाकर देते, सणावाराला घरी बोलावते. पण मुक्या जनावरांना कोण खाऊ घालणार? मी देव पाहिला नाही रे दादा. जनावरांनी चारा खाल्ला की मला देव दिसल्यासारखे वाटते. महागाईच्या काळात ८ रुपयाला पेंडी घेते अन्‌ दहा रुपयाला विकते. यात मला दोन रुपये नफा मिळतो. पण कधी-कधी ग्राहक मागेल तेवढ्याला गवताची पेंढी देते. जनावरांनी चारा खाल्ला यातच मला समाधान वाटते. पूर्वी पावसाचे दिवस चांगले रहायचे. आज तेवढे पावसाचे दिवस राहिले नाहीत. त्यामुळे हिरवा चाराही म्हणावा तेवढा मिळत नाही.

जनावरांचा आशीर्वाद मिळतो...

आठ रूपयाला पेंढी विकत घेऊन मागायला आलेल्या पशुपालकाला दहा रुपयाला विकते. त्यातूूनच घर चालवते. देवाच्या दयेने घरातील मंडळी आनंदी आहेत. जनावरांचा आशीर्वाद मिळतो म्हणून मी आज उभी आहे. नफा मिळावा म्हणून अजिबात चारा विक्री करत नाही. पशुपालक स्वत:हूनच मला दोन रूपये जास्तीचे देतात. त्यावेळेस मला कळते की, जनावरांनी पशुपालकांच्या कानात दोन रूपये म्हातारीला जास्तीचे द्यायला सांगितले आहे.

उमाबाई कोल्हापुरे, चारा विक्री करणारी

फोटो १०