शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी छायेने घेतले दोन बळी

By admin | Updated: August 13, 2014 00:24 IST

सेनगाव : तालुक्यातील चिखलागर तांडा येथे गेल्या दोन दिवसांत दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

सेनगाव : तालुक्यातील चिखलागर तांडा येथे गेल्या दोन दिवसांत दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यावर्षीची दुष्काळी स्थिती व कर्जाचा डोंगर या दुहेरी संकटामुळे शेतकऱ्यांनी हे पाऊल उचलल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.या लहानशा तांड्यावर कुणीही फारसा श्रीमंत शेतकरी नाही. अनेकांची बेताचीच परिस्थिती. आत्महत्याग्रस्त शेतकरीही याच पठडीतले. त्यामुळे त्यांना दुष्काळी परिस्थिती पहावली नाही. हरी रामराव राठोड (वय ४०) यांनी सततच्या नापीकीमुळे व शेतातील दुबारपेरणी व कर्जबाजारीपणामुळे शेतातील एका झाडाला १० आॅगस्ट रोजी गळफास घेवून आत्महत्या केली. या बाबत परिसरात हळहळ व्यक्त होत असतानाच अंकुश चांदू चव्हाण (वय ८२) यांनी शेतातील सर्व पिके वाया गेली, दुबार पेरणी तसेच मुलीचे लग्न डोळ्यासमोर असल्याने कर्ज फेडणे अशक्य असल्याचे कारणाने ११ आॅगस्ट रोजी विष घेतले. दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्यामुळे दोन्ही कुटुंबिय उघड्यावर आले आहेत. सेनगाव तालुक्यात अल्प पावसाचे प्रमाण असून चिखलागर तांडा येथे सुद्धा पाऊस समाधानकारक न झाल्यामुळे कसेबसे या शेतकऱ्यांनी एकदाची पेरणी केली होती; परंतु प्रचंड पाण्याचा दुष्काळ व त्यातून होणारी हेळसांड, हातचे सोयाबीन पीक गेल्याने आता कर्ज फेडणे अशक्य असल्याने या शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्या केलेले शेतकरी हरी श्यामराव राठोड यांना जेमतेम दोन ते अडीच एकर जमीन असून ती कोरडवाहू आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असताना ही घटना घडली आहे. त्यांच्या पश्चात २ मुले व ३ मुली, भाऊ, बहिण असा परिवार आहे. दुसरे शेतकरी अंकुश चांदू चव्हाण यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्यांना दोन मुले, तीन मुली, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्याकडे सुद्धा दोन एकर खरबाळ जमीन असून ती पाण्याअभावी नापीक झाली आहे. यातूनच या दोन्ही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. (वार्ताहर)