शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
3
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
4
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
5
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
6
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
7
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
8
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
9
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
10
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
11
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
12
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
13
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
14
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
15
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
16
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
17
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
18
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
19
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
20
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
Daily Top 2Weekly Top 5

कुरुंद्यात एकाच दिवशी दोन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:28 IST

कुरुंदा : वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे वेगवेगळ्या घटनांत दोन जणांनी आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार, १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ...

कुरुंदा : वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे वेगवेगळ्या घटनांत दोन जणांनी आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार, १२ फेब्रुवारी रोजी सकाळी घडली. एका विवाहित महिलेने दीड महिन्याच्या बाळाला घरी सोडून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. तर दुसऱ्या घटनेत एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या दोन्ही घटना कुरुंदा येथे घडल्या आहेत.

येथील अनिता धोंडिबा खिल्लारे, वय २२ वर्षे या विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे सकाळी ११ च्या सुमारास समोर आले. वसमत रस्त्यावरील वेअर हाऊससमोरील एका शेतात १२ फेब्रुवारी रोजी सकाळी या विवाहित महिलेने आत्महत्या केली. या महिलेचे २ वर्षांपूर्व लग्न झाले होते. मयत महिलेला दीड महिन्याचे बाळ आहे. आत्महत्या केली की अन्य कारण आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नव्हते. घटनास्थळी कुरुंदा पोलीस ठाण्याचे सपोनि. सुनील गोपीनवार, फौजदार सविता बोधनकर, वाळके, आम्ले, दाबनवाड आदींनी भेट दिली आहे. सकाळी ११ वाजल्यापासून विहिरीतील त्या महिलेचे प्रेत बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते; परंतु विहिरीचा पाणी उपसा करूनही पातळी कमी होत नसल्याने रात्री ७ वाजेपर्यंत ते प्रेत बाहेर निघाले नव्हते. आत्महत्येमागचे कारणही स्पष्ट झाले नव्हते. उशिरापर्यंत विहिरीतून प्रेत बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू होती. दीड वर्षाच्या बाळाला सोडून या महिलेने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्यामुळे एका प्रकारे त्या बाळाचे मातृत्व हरवले आहे.

कुरुंदा येथील अण्णाभाऊ साठेनगरमधील पिंटू महादू घोंगडे, वय ३८ वर्षे याने राहत्या घरी शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास गळाफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी अद्याप फिर्याद न दिल्याने या घटनेची नोंद झाली नव्हती.