शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील प्रवासी एसटीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:27 IST

कोरोनाने थांबविल्या फेऱ्या: अपुरे मनुष्यबळाचाही फटका हिंगोली: कोरोनाच्या पार्श्वभूमिवर बंद झालेल्या एसटीच्या बसफेऱ्या अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या नाहीत. ...

कोरोनाने थांबविल्या फेऱ्या: अपुरे मनुष्यबळाचाही फटका

हिंगोली: कोरोनाच्या पार्श्वभूमिवर बंद झालेल्या एसटीच्या बसफेऱ्या अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या नाहीत. ग्रामीण भागातील प्रवाशांची मदार तर अवैध प्रवासी वाहतुकीवरच आहे. त्यातही एसटी आगाराकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने याचाही परिणाम बसफेऱ्या सोडण्यावर होत आहे.

कोरोना संसर्ग आजाराने संपूर्ण जग हातबल झाले आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्याही आतापर्यंत ३ हजार ६६० वर पोचली आहे. लॉकडाउनमुळे तर जवळपास सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. लॉकडाउनमुळे एसटी महामंडळाला मोठा फटका बसला. या काळात तर सर्वच कर्मचाऱ्यांना कामाअभावी घरी बसून रहावे लागले. आता कुठे शासनाने काही नियम शिथील केल्याने प्रमुख मार्गावर बसफेऱ्या सोडण्यात येत आहेत. हिंगोली आगारातून नांदेड, वाशीम, अकोला, परभणीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी बसेस सोडण्यात येत आहेत. मोठ्या शहरात जाणाऱ्या प्रवाशांना सुविधा उपलब्ध झाली असली तरी अद्याप ग्रामीण भागात पूर्ण क्षमतेने बसफेऱ्या सोडण्यात येत नसल्याने प्रवाशांतून संताप व्यक्त केला जात आहे. हिंगोली आगारातून सध्या सेनगाव, रिसोड, खानापूर, सावरगाव आदी मार्गावर बसेस सोडण्यात येत आहेत. तर जांभरून मार्गावर २२ जानेवारीपासून बस सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आगार प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, ग्रामीण भागातील काही मार्गावर बसफेऱ्या सुरू केल्या असल्या तरी अद्याप अनेक मार्गावरील प्रवाशांना एसटीची प्रतीक्षा आहे.

३२ कर्मचारी बेस्टसाठी रवाना

हिंगोली येथील एसटी आगारासाठी १२० वाहक तर १२० चालक राज्य परिवहन महामंडळाने उपलब्ध करून दिले आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेस्टमध्ये कर्मचारी संख्या कमी असल्याने हिंगोली आगारातील प्रत्येकी १६ वाहक, चालकांना मुंबईला बेस्टमध्ये पाठविले आहेत. त्यामुळे हिंगोली आगारामध्ये मष्युबळाची कमतरता जाणवत आहे. याचा परिमाण बसफेऱ्या सोडण्यावरही होत आहे.

२१ बसेस मानव विकाससाठी

हिंगोली आगाराकडे जवळपास ५८ बसेस उपलब्ध आहेत. १० जानेवारीपासून १० बसेस बेस्टसाठी पाठविण्यात आल्या आहेत. आता केवळ ४८ बसेस शिल्लक आहेत. पूर्वी जवळपास १४ फेऱ्या ग्रामीण भागात होत होत्या. मात्र सध्या केवळ पाच ते सहा मार्गावरच फेऱ्या सोडण्यात येत आहेत. यातील २१ बसेस मानव विकास अंतर्गत प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सोडण्यात येतात. शाळा सुरू नसल्या तरी सध्या विद्यार्थ्यांना पास देण्यात येत असल्याची माहिती आगार प्रशासनाने दिली आहे.