शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने आणली उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:13 IST

हिंगोली : कोरोना आधी दोनशे रुपये कसे तरी पदरात पडायचे. परंतु, आज कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी ग्राहक ...

हिंगोली : कोरोना आधी दोनशे रुपये कसे तरी पदरात पडायचे. परंतु, आज कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी ग्राहक कोरोनाच्या भीतीमुळे बाहेर येईना झाले आहेत. परिणामी कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा? हा यक्ष प्रश्न पडला आहे.

सायकलचे पंक्चर काढणे, मोटारसायकलचे पंक्चर काढणे, मोटारसायकलमध्ये हवा मारणे व सायकल रिपेअरिंग करणे यातून मिळालेल्या रोजगारातून पत्नी व मुला बाळांचा सांभाळ केला जायचा. दिवसाकाठी कसे तरी दोनशे रुपये पदरात पडायचे. परंतु, आजमितीस शंभर रुपये पडणेही मुश्कील झाले आहे. कोरोना आधी शाळा, महाविद्यालय चालू होती. तेव्हा विद्यार्थी मोठ्या प्रमाणात पंक्चरच्या दुकानावर येत असत. त्यामुळे रोज अडीचशे ते तीनशे घरी घेऊन जात असे. आज परिस्थिती उलटी झाली आहे. कोरोनाने उपासमारीची वेळ आणली आहे.

शहरात सायकल दुरुस्ती, पंक्चर काढणे, हवा मारणे आदी जवळपास आठ ते दहा दुकाने असतील. सर्वांची हालत हिच आहे. प्रत्येक जण आज हलाखीचे जीवन जगत आहे. शासनाने फूटपाथवर काम करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना शासन कोट्यातून आर्थिक मदत करणे गरजेचे आहे.

उदरनिर्वाह कसा करावा?

कोरोना आजाराचे प्रमाण आजमितीस कमी झाले आहे. परंतु, लोक बाहेर पडण्यास धजत नाहीत. मोटारसायकल, सायकल दुरुस्तीला आली तरच दोन पैसे हातात पडतील. हातात पैसे पडल्यानंतरच अन्नधान्य घरी घेऊन जाता येईल. सद्य:स्थितीत नशिबालाही दोष देता येत नाही. कोरोना आधीसारखे पदरात पडत नसले तरी जे आहे त्यातच समाधान मानत आहे. शासनाने आम्हा छोट्या व्यवसाय चालकांना आर्थिक मदत करावी.

-फारुख पठाण, शिवाजीनगर