शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा नियोजनच्या ५० टक्के निधीची अजून मागणीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:30 IST

जिल्हा परिषदेला सर्वाधिक निधी वार्षिक योजनेत दिला जातो. मात्र याच संस्थेकडूनही प्रस्ताव सादर करण्यास दिरंगाई होत असल्याचे चित्र आहे. ...

जिल्हा परिषदेला सर्वाधिक निधी वार्षिक योजनेत दिला जातो. मात्र याच संस्थेकडूनही प्रस्ताव सादर करण्यास दिरंगाई होत असल्याचे चित्र आहे. मंजूर नियतव्ययाप्रमाणे समिती, सर्वसाधारण सभा अशा ठरलेल्या चाकोरीत नियोजन करून हे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसह सादर करून निधी मागणी करणे आवश्यक असते. मात्र यंदा जि.प.कडून अद्याप तब्बल ४५ कोटी रुपयांचे प्रस्ताव सादर झाले नसल्याचे चित्र आहे. आरोग्य, शिक्षण, पंचायत, महिला व बालकल्याण, समाजकल्याण अशा अनेक विभागांची ही अवस्था आहे. बांधकाम विभागाने काही प्रस्ताव दिले असले तरीही दीड पट नियोजन व दायित्वाचा मुद्दा अजूनही प्रलंबितच आहे. काही नगरपालिकांच्या प्रस्तावांचीही अशीच अवस्था आहे.

जि. प.च्या या परिस्थितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी अनेकदा कानपिचक्या दिल्या आहेत. मात्र तरीही जि. प. प्रशासनाला काही जाग यायला तयार नाही. जसजसा मार्चएण्ड जवळ येईल, तसे हे विभाग जागे होतात, हा दरवर्षीचाच अनुभव आहे. दोन वर्षे निधी वापराची मुभा असलयाने जि. प.कडून त्याचा गैरफायदा घेतला जातो. मात्र यात निधी परत जाण्याची नामुष्की ओढवण्याची भीतीही नाकारता येत नाही. गतवर्षी वेळेपूर्वीच बीडीएस बंद झाल्याने अडचण झाली होती. तरीही जिल्ह्याचा वार्षिक योजनेचा १०० टक्के निधी मिळविण्यात नियोजन विभाग यशस्वी ठरला होता. आयपास प्रणालीत प्रस्ताव सादर न केल्याने अनेक जिल्ह्यांच्या निधीला कात्री लागली होती. हिंगोलीने मात्र आयपासवर आधीच प्रस्ताव सादर केले होते. नियोजन विभागाने जिल्ह्याचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली.