शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीतही सहा हजार मजुरांना मिळाला रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:26 IST

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांच्या हातचा ...

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेला आहे. मात्र, रोजगार हमी योजनेंतर्गंत संचारबंदी काळातही तब्बल ३ हजार ६४७ जॉबकार्ड धारकांच्या हाताला काम उपलब्ध करून दिले असून यातून ६ हजार १२२ मजुरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.

जिल्ह्यात कोरोना संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. मार्च महिन्यात तब्बल दोन वेळेस व आता पुन्हा ३० एप्रिलपर्यंत संचारबंदीचे आदेश आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय ठप्प पडले आहेत. यात मजूर वर्गाला सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. कोरोनाचे नियम पाळून ग्रामपंचायत स्तरावर मजुरांना रोजगार कसा उपलब्ध होईल, याचे नियोजन करून जिल्हा प्रशासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गंत मजुरांच्या हाताला कामे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्यात रोपवाटीका, सिंचन विहीर, बांधावरील वृक्ष लागवड, शेततळे, विहीर पुनर्रभरण, शोष खड्डा, मातीनाला बांध, घरकुल आदींच्या माध्यमातून हाताला कामे उपलब्ध करून दिली आहेत. जिल्ह्यात चालू वर्षात एप्रिल महिन्यात ३ हजार ६४७ जॉब कार्डधारकांना कामे देण्यात आली असून यातून ६ हजार १२२ मजुरांच्या हाताला रोजगार मिळाला आहे.

१८ हजार मजुरांनी केली कामाची मागणी

राज्यभरात मध्यंतरी कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक मजूर कामानिमित्त मोठ्या शहरात स्थलांतरित झाले होते. आता संचारबंदी लागल्याने मजूर पुन्हा गावाकडे परत येत आहेत. त्यामुळे गावात हाताला काम मिळावे यासाठी मोठ्या प्रमाणावर कामाची मागणी वाढली आहे. जिल्ह्यात एकूण १ लाख ७४ हजार ३१२ रोहयो जॉब कार्डची नोंदणी झालेली आहे. त्यापैकी १० हजार ६४१ जॉबकार्डवरील १८ हजार ३६३ मजुरांनी कामाची मागणी प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार प्रशासनाने १० हजार ५९५ जॉब कार्डवरील १८ हजार २८६ मजुरांना रोजगार देऊ केला आहे. मात्र, सध्या जिल्ह्यात ६ हजार १२२ मजुरांच्या हाताला कामे मिळाले आहे.

एप्रिल महिन्यात पुरविलेला तालुकानिहाय रोजगार

तालुका जॉबकार्डधारक संख्या मजूर संख्या

कळमनुरी ८१२ १३१४

औंढा नागनाथ ८९ १३४

वसमत १६९६ २७२८

हिंगोली १००६ १८८४

सेनगाव ४४ ६२

एकूण ३६४७ ६१२२