शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

बदलीसाठी अभियंत्याकडून वरिष्ठ सहायकाने घेतली ३० हजारांची लाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 21:23 IST

१३ ऑगस्ट रोजी तक्रारदाराच्या बदलीचे आदेशही निघाले आहेत.

हिंगोली : साहेबाची ओळख असल्याने बदली करून देतो म्हणून ती केल्याचा मोबदला म्हणून ३० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या जि.प.च्या वरिष्ठ सहायकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी सांयकाळी साडेसहाच्या सुमारास रंगेहाथ पकडले.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली येथील जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात कार्यरत असलेल्या मस्के नामक अभियंत्यास औंढा नागनाथ येथील पंचायत समितीत बदली हवी होती. त्यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे स्वीय सहायक चंद्रशेखर रामनारायण वाजपेयी याच्याकडे यासाठी विचारणा केली. यासाठी वाजपेयीने त्यास होकार दिला.

१३ ऑगस्ट रोजी तक्रारदाराच्या बदलीचे आदेशही निघाले आहेत. तर ठरल्याप्रमाणे बदली औंढा नागनाथ पंचायत समिती येथे झाली आहे. या बदलीचा मोबदला म्हणून वाजपेयी याने तीस हजार रुपये लाचेची मागणी केली. सदर रक्कम आज देण्याचे ठरले. दरम्यान, मस्के यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यावरून सायंकाळी जि.प.त सापळा रचला. या सापळ्यात वाजपेयी अलगद अडकला. जिल्हा परिषदेमध्ये लाचलुचपतचे उपाधीक्षक नीलेश सुरडकर, जमादार विजयकुमार उपरे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, तानाजी मुंडे, रूद्रा कबाडे, हिम्मतराव सरनाईक यांच्या पथकाने सापळा यशस्वी केला. याप्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणHingoliहिंगोली