शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

दहा वाजता सुरू होते नोंदणी; दहा मिनिटांत लसीकरण केंद्र हाऊसफुल्ल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:30 IST

जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे १ मेपासून आजपर्यंत ४,२७६ लसीकरण झालेले आहे. जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास १३ लाखांच्या ...

जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे १ मेपासून आजपर्यंत ४,२७६ लसीकरण झालेले आहे. जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास १३ लाखांच्या आसपास आहे. यात १८ ते ४४ वयोगटातील लोकसंख्या ३ लाख ९० हजारांच्या जवळपास असू शकते. या सर्वांना ऑनलाइन नोंदणीही बंधनकारक केली आहे. आतापर्यंत १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण १ टक्का झाल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

जिल्ह्यात लसीकरणासाठी ३३ केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. लसीकरण आणि आरटीपीसीआर एकाच छताखाली येत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने शहरातील कल्याण मंडपम् येथे लसीकरण केंद्र सुरू केले. त्यानंतर लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिक व युवकांकडून प्रतिसाद मिळत असल्यामुळे शहरात सरजूदेवी विद्यालयात नवीन केंद्रही निर्माण केले. लसीकरणासाठी आरोग्य विभागाने सकाळी १० ते सायंकाळी ५ अशी वेळ दिली आहे. एवढे असतानाही या ठिकाणी लसीकरण करून घेण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे.

खरे पाहिले तर ज्यांचे दोन्ही डोस झाले आहेत, अशांनी विनाकारण गर्दी न करता घरी बसणे त्यांच्यासाठी हितावह ठरणार आहे. परंतु, तेही विनाकारण लसीकरण केंद्रांसाठी गर्दी करू लागले आहेत.

१८ ते ४४ वयोगटासाठी ऑनलाइन नोंदणी करण्याचे शासनाने सांगितले आहे. त्याप्रमाणेच नोंदणी करून घेणे गरजेचे आहे. लसीकरण केंद्रांवर मास्क व सामाजिक अंतर ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांची कसरत

जिल्ह्यात ३३ लसीकरण केंद्रे असली तरी अनेक ठिकाणी गर्दी दूर करण्यासाठी गार्डची व्यवस्था नाही. जिल्ह्यात लसीकरणाची नोंदणी करण्यासाठी काही जण कर्मचाऱ्यांच्या अगदी जवळ जातात. त्यामुळे नोंदणी करताना अडथळा निर्माण होत आहे. लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ सायंकाळी पाच वाजेची असली तरी सर्व रिपोर्ट वरिष्ठांना देईपर्यंत कंत्राटी कर्मचाऱ्यास सायंकाळचे सात वाजत आहेत. ज्यांचे दोन्ही डोस झाले आहेत, अशांनी केंद्रांवर गर्दी करू नये, असे आवाहन डेटा एंट्री ऑपरेटर बालाजी मास्के यांनी केले आहे.