शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणासाठी रांगच रांग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:30 IST

हिंगोली : लसीकरण सुरळीत व्हावे म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने शहरात चार केंद्रांची स्थापना करण्यात आली; परंतु चारही केंद्रांवर लसीकरणासाठी ...

हिंगोली : लसीकरण सुरळीत व्हावे म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने शहरात चार केंद्रांची स्थापना करण्यात आली; परंतु चारही केंद्रांवर लसीकरणासाठी रांगच रांग लागलेली पहायला मिळत आहे. दुसरीकडे केंद्रावर पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे भर उन्हात नागरिकांचा घसा कोरडा पडत आहे.

१ मेपासून १८ ते ४४ वयोगटाच्या पुढील लोकांना लसीकरण देणे शासनाने सुरू केले आहे. विशेष म्हणजे लसीकरणासाठी युवकांचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. हे पाहून जिल्हा प्रशासनाने शहरात चार केंद्रांची निर्मिती केली आहे, तरीही लसीकरणासाठी रांगच रांग लागत असल्याचे पहायला मिळत आहे. चारही केंद्रांवर लसीकरण व्यवस्थित व्हावे यासाठी गार्डची व्यवस्था केली असली तरी गार्ड मात्र आलेल्या नागरिकांना रांगेत उभे करण्याऐवजी चक्क बाहेर खुर्ची टाकून बसलेले पहायला मिळत आहेत.

सद्य:स्थितीत शहरातील कल्याण मंडपम्‌ येथे २ (पहिला आणि दुसरा मजला), सरजूदेवी विद्यालय येेथे १ आणि माणिक स्मारक आर्य विद्यालय येेथे १ अशी चार केंद्रे निर्माण केली आहेत.

उन्हाचा पारा गत पाच-सहा दिवसांपासून वाढलेला आहे. वाढत्या उन्हामुळे बाहेर पडणेही मुश्कील होऊन बसले आहे. लसीकरण केंद्रावर पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे असतानाही पाण्याची व्यवस्था केली नाही. त्यामुळे अनेक जण घरूनच पाणी आणत आहेत. खरे पाहिले तर चारही केंद्रांवर नगर परिषदेने पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांनी केली आहे.

वाहने अस्ताव्यस्त ; वृद्धांना त्रास

शहरातील कल्याण मंडपम्‌ पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर लसीकरणाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. शहरातील काही लोकांना हे केंद्र जवळचे असल्याने अनेक जण वाहने घेऊन येतात; परंतु अस्ताव्यस्त वाहने उभी करत असल्यामुळे वयोवृद्धांना लसीकरणाच्या ठिकाणी जाताना अतोनात त्रास होत आहे. नगर परिषदेने अग्निशमन विभाग परिसरात वाहने लावण्यासाठी यापूर्वी जाहीर केलेले असतानाही कोणीही त्या ठिकाणी वाहने उभी करत नाहीत. वाहनांची संख्या पाहता या ठिकाणी गार्डची व्यवस्था करणे गरजेचे आहे.