शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत कडकडीत बंद

By admin | Updated: November 11, 2014 15:43 IST

नगर जिल्ह्यातील जवखेडा येथील हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करावी, या प्रमुख मागणीसाठी आंबेडकरी संघटनांच्या वतीने पुकारलेल्या परभणी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

परभणी: नगर जिल्ह्यातील जवखेडा येथील हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करावी, या प्रमुख मागणीसाठी आंबेडकरी संघटनांच्या वतीने पुकारलेल्या परभणी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिवसभर कडकडीत बंद राहिल्याने बाजारपेठ व रस्त्यांवर शुकशुकाट जाणवला. दुपारी शनिवार बाजार येथून काढण्यात आलेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात जिल्हाभरातून नागरिक सहभागी झाले होते.पाथर्डी तालुक्यातील जवखेडा येथे २१ ऑक्टोबर रोजी जाधव कुटुंबियातील तिघांची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. या घटनेने फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्राला काळीमा फासली गेली. घटनेला २0 दिवसांचा कालावधी उलटूनही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे याच्या निषेधार्थ परभणी जिल्ह्यातील आंबेडकरी संघटनांच्या वतीने १0 नोव्हेंबर रोजी परभणी बंदचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला विविध पक्ष,संघटना व विविधस्तरातून जाहीर पाठिंबा देण्यात आला होता. बंदच्या आवाहनानुसार सोमवारी सकाळपासूनच बाजारपेठ कडकडीत बंद राहिली. शहरातील कच्छी बाजार, गुजरीबाजार, जनता मार्केट, शिवाजीचौक, नानलपेठ, गांधी पार्क हा भाग मुख्य बाजारपेठेचा आहे. या ठिकाणी नेहमीच मोठी वर्दळ असते. परंतु, सोमवारी मात्र दिवसभर या भागातील रस्त्यांवर शुकशुकाट जाणवला. विशेष म्हणजे, शहराला लागून असलेल्या वसाहती आणि परिसरातील दुकानेदेखील कडकडीत बंद ठेवण्यात आली. बंदमुळे शहरातील रस्त्यांवर तुरळक वर्दळ दिसून आली. सायंकाळी ४वाजेपर्यंत हा बंद पाळण्यात आला. सायंकाळी ४ वाजेनंतर शहरातील व्यवहार सुरु झाल्याचे पहावयास मिळाले. बंद काळामध्ये शहरातील काही प्रतिष्ठानांवर दगड फेकून काच फोडल्याचा प्रकार वगळता कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही