शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पीपल्स् बँकेतर्फे ३२५ जणांना मोफत कोरोना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:29 IST

हिंगोली : येथील ओमप्रकाश देवडा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लि. चे संस्थापक अध्यक्ष स्व. ओमप्रकाश देवडायांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित मोफत ...

हिंगोली : येथील ओमप्रकाश देवडा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लि. चे संस्थापक अध्यक्ष स्व. ओमप्रकाश देवडायांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित मोफत कोरोना लसीकरण अभियानात गुरूवारी ३२५ लाभार्थ्यांना कोरोना वॅक्सिनची लस मोफत देण्यात आली. या अभियानाचे शुभारंभ जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत मातोश्री गंगादेवी देवडा निवासी अंध विद्यालय, हिंगोली या शाळेतील अंध शिक्षकांना लस देण्यात आली. याप्रसंगी जिल्हा समाज कल्याण अधिकारी एस. के. मिनगिरे यांची उपस्थिती होती. लसीकरण अभियानाच्या पुर्वी स्व. ओमप्रकाश देवडा यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व जिल्हा समाज कल्याण अधिकारी एस.के. मिनगिरे यांनी माल्याअर्पण करुन आदरांजली वाहली. यावेळी बँकेचे अध्यक्ष सुनिल देवडा, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर जोशी, उपसरव्यवस्थापक शशिकांत कंदी व गांधी सेवा ट्रस्टचे अध्यक्ष बद्रीनारायण बगडीया यांनी स्वागत केले. बँकेचे उपाध्यक्ष प्रकाशचंद सोनी, बँकेचे संचालक शशिकांत दोडल, ज्ञानेश्वर मामडे, राजेश अग्रवाल, अशिष काबरा, माधव हॉस्पिटलचे ड्रायरेक्टर डॉ. सचिन बगडिया, डॉ. कंचन बगडिया, डॉ. बनवारीलाल बगडिया, अंध विद्यालयाचे मुख्यध्यापक नंदकिशोर भालेराव,अशिष पिंगळकर उपस्थितीत होते. बँकेतर्फे आयोजित या लसिकरण मोहिमेसाठी २०० लसिकरणाचे लक्ष नियोजित करण्यात आले होते. परंतु नागरिकांचे प्रतिसाद पाहून बँकेने या लसिकरणाचे लक्ष आता ५०० असे केले आहे. गुरूवारी ३२५ नागरिकांना लसिचा फायदा देण्यात आला. उर्वरित लसीचा फायदा नागरिकांना देण्यात येणार आहे असे बँकेचे अध्यक्ष सुनिल देवडा यांनी बोलतांना सांगितले. सहकाररत्न ओमप्रकाश देवडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी आरोग्य शिबीराचे आयोजन बँकेतर्फे करण्यात येते. यावर्षी कोरोना महामारीमुळे नागरिकांची लसिकरणासाठी गरज असलेली ही मोहीम बँकेने शहरातील जेष्ठ नागरिकांसाठी राबवलि व नागरीकाकडून या मोहिमेस भरगच्च प्रतिसाद मिळाला. या अभियानास यशस्वी करण्यासाठी सुनिल थोरात, ज्ञानोबा गव्हाणे, मारोती सुर्यवंशी, आखिलेश याज्ञिक, धोंडुअप्पा रणखांब, संदिप सावळे, ऋषिकेश पांचाळ, रामचंद्र श्रीखंडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन संजय बोहरा यांनी केले. (वाणिज्य वार्ता)