शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ताप, हिवताप व दमाचे रुग्ण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:27 IST

पाणवट्टे तयार करण्याची मागणी रामेश्वर तांडा : कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा परिसरात वन विभागाची मोठी जमीन आहे. या वनामध्ये ...

पाणवट्टे तयार करण्याची मागणी

रामेश्वर तांडा : कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा परिसरात वन विभागाची मोठी जमीन आहे. या वनामध्ये निलगाय, रोही, रानडुकर, हरिण, मोर व इतर वन्य जनावरे आहेत. पण सध्या उन्हाळ्याची सुरूवात होत असल्याने या भागातील अनेक पाणीस्त्रोत कोरडे पडत आहे. यामुळे वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. या वन्य प्राण्यांच्या पाण्यासाठी पानवट्टे उभारण्यात यावे अशी मागणी वनप्रेमींतून होत आहे.

गावातील उकीरडा साफ करावे

रामेश्वर तांडा : कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा जि.प. प्रशालेच्या पाठीमागून गावाचा मुख्य रस्ता गेलेला आहे. या रस्त्यावर नागरिकांनी केचकरचा टाकल्याने आता याठिकाणी मोठा उकीरडा निर्माण झाला आहे. यासाठी शाळेच्या पाठीमागे असणारा हा उकीरडा साफ करावा, अशी मागणी गावकऱ्यांसह पालक वर्गातून होत आहे.

उड्डाणपुलाचे काम संथगतीने

हिंगोली : शहरातील खटकाळीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम मागील दीड वर्षापासून होत आहे. संथगतीने होणाऱ्या या पुलाच्या कामामुळे याठिकाणाहून ये जा करणाऱ्या वाहनधारकांना वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच रस्ते उखडलेले असल्यामुळे अनेक दुचाकीस्वार पडून जखमी होत आहे. यासाठी या पूलाचे काम जलदगतीने व्हावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

हरभरा काढणी अंतिम टप्प्यात

फाळेगाव : हिंगोली तालुक्यातील फाळेगाव शेतशिवारात हरभरा पिकाची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील हरभरा पिक काढले असून या पिकात कुठे घट तर कुठे वाढ झाली आहे. या पिकाची काढणी झाल्यानंतर बाजारपेठेत हरभरा पिकास चांगला भाव मिळावा अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे.

महावितरणकडून वसुली मोहीम सुरू

हिंगोली : शासनाच्या आदेशानंतर शहरात महावितरण विभागाकडून वीजबिल वसुलीची मोहीम कडक करण्यात आली आहे. प्रत्येक नागरिकांनी वीजदेयके भरावीत म्हणून महावितरणचे कर्मचारी नागरिकांच्या घरोघरी जावून वसुली करीत आहेत. अनेक नागरिकांनी कोरोनामुळे मागील एक वर्षभराचे वीजबिल न भरल्यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांचे वसुलीचे काम वाढले आहे.

पथदिव्यांचा प्रश्न मार्गी लागेना

बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा गावासह पिंपरखेड गावातील पथदिवे बंद अवस्थेत आहेत. गावात अंधार राहत असल्यामुळे रस्त्यावरुन ये जा करणाऱ्या गावकऱ्यांना ठेसा लागत असल्याचे प्रकारही घडत आहेत. तसेच रस्त्यावरील खड्ड्यात पाय जावून गावकरी पडत असल्याचेही दिसत आहे. यामुळे गावातील पथदिवे दुरूस्त व्हावे अशी मागणी होत आहे.

स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज

हिंगोली : शहरातील गांधी चौक, इंदिरा गांधी, इंदिरा खुले नाट्यगृह परिसरात मोठा कचरा जमा झालेला आहे. हा कचरा साफ करण्यासाठी स्वच्छता मोहीम राबविण्याची माेहीम राबविण्याची गरज असल्याची चर्चा शहरवासियांतून होत आहे. बऱ्याच ठिकाणी कचऱ्यामुळे दुर्गंधही पसरत आहे. यामुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.

अल्पवयीन दुचाकीस्वार वाढले

हिंगोली : शहरात अनेक अल्पवयीन मुले दुचाकी चालवित असताना दिसून येत आहे. या दुचाकी चालकांचा शहरात आपले वाहन चालवितांना अनेकदा आपला वाहनावरील ताबा सुटत आहे. त्यामुळे शहरात अपघातांच्या संख्या वाढली आहे. या दुचाकीस्वरांमुळे अनेक सुज्ञ नागरिकांच्या वाहनांचा अपघात होत आहे. यामुळे वाहतूक शाखेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.