माळी यांनी पं. स. कार्यालयातील कर्मचारी उपस्थितीबाबत आढावा घेतला. या आढाव्यात त्यांना एक लिपिक गैरहजर असल्याचे आढळून आले. या कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेशही त्यांनी दिले. तसेच पंचायत समिती आवारात स्वच्छता मोहीम राबवून स्वत: व अधिकारी कर्मचारी यांच्यासोबत स्वच्छता केली. तसेच दर आठ दिवसाला पंचायत समिती परिसरात स्वच्छता करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या. पं. स. आवारात केलेल्या घनदाट वृक्ष लागवडीची पाहणी पाहणी करून त्यांनी याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे प्रशासन अधिकारी राधेशाम परांडकर, कार्यालयीन अधीक्षक सूर्यकांत घवाड, व्ही. एस. पाईकराव, राजेश बाहेती, शेख सलीम, मार्कड, शितळे, रणवीर, गंगाधर शेळके, प्रमोद देशपांडे, चव्हाण आदी कर्मचारी उपस्थित होते.