शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस वसाहतीमधील निवासस्थाने खाली करण्याच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:20 IST

हिंगोली : शहरातील जुन्या पोलीस वसाहतीमधील शासकीय निवासस्थानांची दुरवस्था झाली असून ती कधीही कोसळून जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता ...

हिंगोली : शहरातील जुन्या पोलीस वसाहतीमधील शासकीय निवासस्थानांची दुरवस्था झाली असून ती कधीही कोसळून जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही निवासस्थाने तत्काळ रिकामी करावीत, अशा नोटिसा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी वसाहतीमध्ये राहणाऱ्या पोलीस अधिकारी, अंमलदारांना पाठविल्या आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात निवासस्थाने खाली करावी लागणार असल्याने कर्मचाऱ्यांची धावपळ होणार आहे.

शहरातील संत नामदेव पोलीस कवायत मैदानाच्या पाठीमागे पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी जवळपास ३० ते ३५ वर्षांपूर्वी पोलीस वसाहत उभारण्यात आली आहेे. या वसाहतीमध्ये १२६ निवासस्थाने आहेत. शहराच्या मध्यभागी वसाहत असल्याने कर्मचाऱ्यांसाठी ही वसाहत सोयीची ठरत होती. त्यामुळे सर्व निवासस्थाने भरून राहत होती. कालांतराने निवासस्थानांची दुरवस्था होण्यास सुरुवात झाली. काही निवासस्थानांच्या भिंतीला तडे गेले असून स्वच्छतागृहांचीही दुरवस्था बनली आहे. तरीही सध्या ८० ते ८२ कर्मचारी कुटुंबीयांसह वास्तव्याला आहेत. शुद्ध हवा, मोकळा परिसर असल्याने कर्मचाऱ्यांना ही वसाहत सोडावीशी वाटत नाही. मात्र ही निवासस्थाने जुनी झाल्याने दुरवस्था बनली असून धोकादायक बनली आहेत. पावसामुळे निवासस्थाने कधीही कोसळून जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग व नांदेड येथील श्री गुरुगोविंदसिंघजी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाने निवासस्थानांचे सर्वेक्षण केले होते. यात ही निवासस्थाने धोकादायक असल्याचा निष्कर्ष काढला आहे. त्यामुळे ही निवासस्थाने तत्काळ रिकामी करावीत, अशा नोटिसा कर्मचाऱ्यांना बजावल्या आहेत. आतापर्यंत ६२ कर्मचाऱ्यांना नोटिसा पोहोचल्या असून उर्वरित कर्मचाऱ्यांना नोटिसा देण्याचे काम सुरू आहे.

बॉक्स

निवासस्थानांची दुरुस्ती करणेही अशक्य

शहरातील जुन्या पोलीस वसाहतीतील निवासस्थानांचे सर्वेक्षण श्री गुरुगोविंदसिंघजी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाने केले होते. यात ही निवासस्थाने धोकादायक असल्याचा अहवाल दिला आहे. तसेच या निवासस्थानांची दुरुस्ती करणेही अशक्य असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे.

बॉक्स

ऐन पावसाळ्यात कुठे जाणार?

पोलीस वसाहतीतील निवासस्थाने खाली करण्याच्या नोटिसा मिळाल्यानंतर वास्तव्यास असलेले कर्मचारी चांगलेच गोंधळून गेले आहेत. ऐन पावसाळ्यात आता कुठे घर शोधावे? या चिंतेत ते आहेत. नवीन पोलीस वसाहतीमध्येही दोन ते तीनच निवासस्थाने रिकामी असल्याची माहिती आहे. त्यामुळे जुन्या पोलीस वसाहतीमधील कर्मचाऱ्यांना आता किरायाच्या खोलीतच कुटुंब हलवावे लागणार आहे. मात्र कोरोना काळात किरायाचे घर शोधणेही अवघड बनल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. तसेच जुन्या निवासस्थानाची डागडुजी केल्यास आणखी तीन ते चार वर्षे तरी राहता येईल, अशा प्रतिक्रियाही काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.

कोट

जुन्या पोलीस वसाहतीतील निवासस्थानांची दुरवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व श्री गुरुगोविंदसिंघजी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाने सर्वेक्षण केले असून ही निवासस्थाने राहण्यासाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार या वसाहतीमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांना निवासस्थाने रिकामी करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत.

- यशवंत काळे, अप्पर पोलीस अधीक्षक, हिंगोली.

फोटो :