शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

ना कॉल, ना ओटीपी, तरी बँकेतून पैसे गायब ! फ्री गेम, अनोळखी ॲप परमीशन टाळा !!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:20 IST

हिंगोली : स्मार्टफोनमुळे सर्व माहिती एका क्षणात मिळत असली तरी यातून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. कोणी कॉल केला नाही, ...

हिंगोली : स्मार्टफोनमुळे सर्व माहिती एका क्षणात मिळत असली तरी यातून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. कोणी कॉल केला नाही, ओटीपीही मागितला नाही तरी बँक खात्यातून पैसे गायब होत असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात सध्या तरी अशी एकही फसवणुकीची घटना दाखल नाही. मात्र, अनेक ॲपमध्ये ऑटो रिड ओटीपीची परवानगी दिली जात असल्याने यातून फसवणूक होत आहे.

स्मार्टफोनमुळे सर्व व्यवहार ऑनलाईन झाले आहेत. पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी विविध ॲप डाऊनलोड केले जात आहेत. फेसबुक, इंन्स्टाग्राम, ट्विटरमुळे काही माहिती क्षणात मिळत असली तरी यातून चुकीची माहितीही पसरवली जात आहे तसेच फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. फेसबुकवरील प्रोफाईलवरून फोटो वापरून बनावट अकाैंट तयार करून तसेच ओटीपी मागून पैसे परस्पर उचलून घेतल्याचे प्रकार घडले आहेत. आता तर कोणताही कॉल न करता तसेच ओटीपी न मागता बँक खात्यातून परस्पर पैसे गायब होत असल्याचे प्रकार घडत आहेत. हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत अशी एकही घटना घडल्याचे समोर आले नसले तरी फ्री गेम, अनोळखी ॲप डाऊनलोड करण्याच्या नादात ऑटो रिड ओटीपीची परवानगी दिली जात आहे. त्यातूनच आपली फसवणूक होत आहे.

पैसे परत मिळण्याची शक्यता कमीच

-आपल्या बँक खात्यातून एकदा ऑनलाईन माध्यमातून फसवणूक झाली तर सहसा हे पैसे परत मिळण्याची शक्यता कमीच असते.

- तरीही काही मिनिटांत सायबर सेलला अशा फसवणुकीची माहिती दिल्यास सायबर सेल पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो. मात्र, तरीही शंभर टक्के पैसे परत मिळतीलच, असे सांगता येत नाही.

- त्यामुळे अनोळखी व्यक्तीला ओटीपी न सांगणे, आपली वैयक्तिक माहिती न देणे हेच आपल्याचा फसवणुकीपासून वाचवू शकते.

अनोळखी ॲप नकोच

मोबाईलमध्ये विविध ॲप डाऊनलोड करण्याची स्पर्धाच लागली आहे. त्यात काही खात्रीशीर ॲप असले तरी सायबर चोरटे विविध क्लृप्त्या वापरून मोबाईलधारकांना गंडा घालण्यात तरबेज झालेत. फ्री ॲपच्या माध्यमातून अमिष दाखविले जाते. या अमिषाला मोबाईलधारक बळी पडतो. ॲप डाऊनलोड करताना ऑटो रिड ओटीपीची परवानगीही दिली जाते. त्यामुळे आपल्या खात्यातून आपल्याला कोणतीही कल्पना नसताना पैसे कमी होतात.

ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे२०१९-००

२०२० - ००

२०२१ -००

मोबाईलधारक बाळगताहेत सावधगिरी

जिल्ह्यात ऑनलाईन फसवणुकीची एकही घटना दाखल नसली तरी २०२१ मध्ये इतर फसवणुकीच्या तीन घटना आहेत तसेच २०२० मध्ये १६ प्रकरणांची नोंद सायबर सेलकडे आहे. ऑनलाईन फसवणुकीची एकही घटना नसल्याने जिल्ह्यातील मोबाईलधारक सावधानता बाळगत असल्याचे दिसून येत आहे.

मोबाईलमध्ये कोणतेही ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी आपली फसवणूक होणार नाही ना याची काळजी घ्यावी तसेच अनोळखी ॲपला परमिशन देण्याचे टाळण्यास होणारी फसवणूक टाळता येईल.

- उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा