शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

जुन्याच शिथिलतांसह दुकानांसाठी नवा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:20 IST

हिंगोली : ‘ब्रेक दी चेन’अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी १८ जून रोजी काढलेल्या नव्या आदेशात ११ जूनप्रमाणेच असलेल्या सर्व शिथिलता कायम ...

हिंगोली : ‘ब्रेक दी चेन’अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी १८ जून रोजी काढलेल्या नव्या आदेशात ११ जूनप्रमाणेच असलेल्या सर्व शिथिलता कायम ठेवण्यात आली असून, वेळेसह इतर कोणत्याही बाबीत बदल केला नसल्याचे दिसत आहे.

जिल्हा अजूनही स्तर २ मध्ये आहे. त्यामुळे जमावबंदी कायम आहे. जिल्ह्यात किराणा, भाजीपाला, फळ, बेकरी, मिठाई, चिकन, मटन, अंडी, पाळीव प्राणी खाद्य विक्रेते, पावसाळी हंगामपूर्व साहित्य विक्रेते यांची दुकाने सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत चालू ठेवता येतील. दूध विक्री केंद्रांना सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत मुभा दिली. ई-कॉमर्स, कुरिअर, बजार समिती, कृषी संबंधित खते, बियाणे, अवजारे आदींसह दुरुस्तीची दुकानेही सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सुरू राहतील.

अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व आस्थापना दुकानांनाही सकाळी १० ते रात्री ८ ची वेळ दिली. खानावळ, रेस्टॉरंट यांना कोरोना नियमांचे पालन करून ५० टक्के उपस्थिती मर्यादेत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत उघडण्यास परवानगी दिली. शासकीय व खासगी कार्यालयातील उपस्थिती १०० टक्के राहील. लग्नसमारंभ शक्यतो कोर्ट मॅरेज व शक्य नसल्यास वधू-वरांसह ५० जणांच्या उपस्थितीत पार पाडण्यास परवानगीची गरज नाही, अन्यथा तहसीलला पूर्वकल्पना देणे बंधनकारक राहील. अंत्यसंस्कारासाठी २० जण उपस्थितीला परवानगी असेल.

जिल्ह्याबाहेर खासगी वाहन, टॅक्सी, बस, रेल्वेने प्रवासाची परवानगी असेल. मात्र, राज्यातील स्तर ५ मध्ये येणाऱ्या जिल्ह्यात थांबण्यासाठी अथवा त्या जिल्ह्यातून प्रवासासाठी ई-पास बंधनकारक असेल. महामंडळाच्या बस पूर्ण क्षमतेने वाहतूक करू शकतील. मात्र, प्रवासी उभे राहून प्रवास करता येणार नाही. मास्कचा वापर अनिवार्य आहे. मालवाहतुकीसोबत केवळ तीन व्यक्तींना परवानगी राहील. खासगी, शासकीय बांधकामांनाही परवानगी राहणार आहे. बँका नियमित वेळेत सुरू राहणार असून, उद्योगही कोरोनाच्या नियमांचे पालन करून सुरू ठेवता येतील.

धार्मिक स्थळे, शाळा बंदच

जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे, जत्रा, यात्रा, उरूस, मिरवणुका आदींना पुढील आदेशापर्यंत बंदी कायम आहे. तर शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस बंद असतील. ऑनलाइन वर्ग घेण्यास परवानागी असेल. जिल्ह्यात आंदोलने, धरणे, उपोषणे, मोर्चा यांना पूर्णपणे बंदी असेल. या आदेशात ज्या दुकाने, आस्थापनांना परवानगी दिली, त्यांनीच दुकाने उघडायची आहेत. यात ज्यांचा उल्लेख नाही, त्यांना पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यात बंदी असेल. या आदेशाचे उल्लंघन केल्यास दंडासह कायदेशीर कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिला आहे.

सभागृहे अटींवर उपलब्ध

सार्वजनिक ठिकाणी, खुल्या मैदानात फिरणे, सायकलिंग, सर्व क्रीडा प्रकारांना परवानगी असेल तर इनडोअर क्रीडा प्रकारास सकाळी ५ ते ९ व सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत परवानगी असेल. जिल्ह्यात लॉन्स, मंगल कार्यालये यांना केवळ ५० नागरिकांच्या क्षमतेने लग्न सोहळा करता येईल. तर सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक सभा, बैठका इत्यादी कार्यक्रमांना हॉलच्या ५० टक्के क्षमतेच्या नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजण्यास परवानगी असेल.

जिमला ५० टक्क्यांची अट कायम

जिल्ह्यातील जिम, व्यायामशाळा, स्पा, केशकर्तनालय, ब्युटी पार्लर यांना केवळ ५० टक्के ग्राहकांच्या क्षमतेने दुकाने उघडण्यास परवानगी असेल. मात्र, वातानुकूलित यंत्र वापरता येणार नाही. सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्सही ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत चालू करण्यास परवानगी असेल.