शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुली ‘लॉक’; बेपत्ता होण्याचे प्रमाण घटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:20 IST

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन, पोलीस यांच्या वतीने मार्च २०२० पासून कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे जिल्हा हद्दीच्या ...

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन, पोलीस यांच्या वतीने मार्च २०२० पासून कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे जिल्हा हद्दीच्या बाहेर कोणालाही जाता येत नव्हते. या काळात लहानापासून ते थोरापर्यंत तसेच अल्पवयीन मुलीसह सर्वचजण घरात अडकून पडले होते. मध्यंतरी काही दिवस निर्बंध शिथिल करण्यात आल्याने या काळात १७ मुली तर २०२१ मध्येही सुरुवातीचे तीन महिने निर्बंध शिथिल असल्यानेही या काळात १३ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी अपहरण झाल्याच्या नोंदी पोलीस ठाण्यात घेण्यात आल्या आहेत. दरम्यान, बेपत्ता झालेल्या मुलींचा शोध घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी पथकाला कामाला लावले आहे. दोन महिन्यापूर्वीच हिंगोलीतील एका अल्पवयीन मुलीचा काही तासातच शोध घेऊन पालकाच्या स्वाधीन केले होते.

अडीच वर्षांत ५६ पैकी ४७ बेपत्ता मुलींचा शोध लावण्यात यश

२०१९ मध्ये जिल्ह्यात २६ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यापैकी तब्बल २५ मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले. तर केवळ एका मुलीचा शोध लावणे बाकी आहे. २०२० मध्ये १७ मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यापैकी पोलिसांनी १५ अल्पवयीन मुलींचा शोध लावला. तर दोन मुली अद्याप बेपत्ता आहेत. तसेच २०२१ मध्ये मे महिन्यापर्यंत १३ अल्पवयीन मुली बेपत्ता असून यापैकी ७ मुलीना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. तर ६ अल्पवयीन मुलींचा शोध लावण्यासाठी पोलिसांचे पथक कामाला लावले आहे.

अंमलदारांसह सायबरसेलचे पथक कामाला

अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली तर तत्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो. यातून एखादा धागा हाती लागला की शोध घेणे सुलभ होते. बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलींचा शोध सायबर सेलच्या मदतीने तपास अंमलदार घेत आहेत. तसेच नातेवाईकांनाही अल्पवयीन मुलीबाबतची माहिती वेळीच पोलिसांना दिल्यास अल्पवयीन मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना मदत होईल.

बेपत्ता मुलींचा शोध घेण्यासंदर्भात तपास अंमलदारांसह सायबर सेलच्या पथकाला सूचना दिल्या आहेत. पालकांनीही घरात विश्वासाचे, आपलेपणाचे वातावरण तयार करणे गरजेचे आहे. तसेच आपला पाल्य काय करतोय, याकडे लक्ष दिल्यास अशा घटना टाळता येतील.

-यशवंत काळे, प्रभारी पोलीस अधीक्षक, हिंगाेली