शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

पाच लाख रुपयासाठी विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:28 IST

पाणी भरण्यावरून मारहाण कळमनुरी : औंढा नागनाथ तालुक्यातील जलालदाभा येथे ११ फेब्रुवारीच्या दुपारी तीन वाजेच्या सुमारास सार्वजनिक बोअरचे पाणी ...

पाणी भरण्यावरून मारहाण

कळमनुरी : औंढा नागनाथ तालुक्यातील जलालदाभा येथे ११ फेब्रुवारीच्या दुपारी तीन वाजेच्या सुमारास सार्वजनिक बोअरचे पाणी भरण्याच्या कारणावरून एकास मारहाण* झाल्याची घटना घडली. याप्रकरणी तुळसाबाई गारुळे यांच्या फिर्यादीवरून धुरपताबाई बर्गे, गयाबाई माघाडे,, कौसाबाई बंदुके यांच्याविरुद्ध कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात फिर्यादीस सार्वजनिक बोअरचे पाणी भरण्याच्या कारणावरून शिवीगाळ करत थापड बुक्क्यांनी मारहाण* केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सपोउपनी थोरात करीत आहेत

वीज बिल भरणासाठी पैशांची जुळवाजुळव

कळमनुरी: तालुक्यात अनेक गावातील शेतातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. ऐन पीक बहरात असताना वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आता पीक वाचविण्यासाठी शेतकरी पैशांची जुळवाजुळव करीत असल्याचे दिसून येत आहेत. शेतातील वीज पुरवठा खंडित करण्यासंदर्भात यापूर्वी कोणत्याही सूचना दिल्या नसल्याच्या शेतकरी तक्रारी करीत आहेत. वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.

धुळीच्या त्रासाने कर्मचारी वैतागले

हिंगोली: येथील बसस्थानकाच्या नूतन इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. बांधकाम करण्यासाठी जुने बसस्थानक पाडून तात्पुरता प्रवासी निवारा उभारण्यात आला आहे. मात्र प्रवासी निवारासभोवती डांबरीकरण नसल्याने मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. या धुळीच्या त्रासाने कर्मचारी, प्रवासी वैतागले असून या परीसरात डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.

मोकाट जनावरांचा त्रास वाढला

हिंगोली: शहरातील प्रमुख रस्त्यावर मोकाट जनावरे ठाण मांडून बसत आहेत. मुख्य रस्त्यावरच जनावरे बसत असल्याने इतर वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. अनेकवेळा यामुळे वाहतूक विस्कळीत होत आहे. मोकाट जनावरांना पकडून कोंडवाड्यात कोंडावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.