शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात एक लॅब; १८९९८ जणांची झाली कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:27 IST

जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये २३ कर्मचारी कार्यत असून यात ३ डाॅक्टर, १५ लॅब टेक्नीशीयनचा समावेश आहे. ही लॅब २६ ऑक्टोबर ...

जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये २३ कर्मचारी कार्यत असून यात ३ डाॅक्टर, १५ लॅब टेक्नीशीयनचा समावेश आहे. ही लॅब २६ ऑक्टोबर २०२० मध्ये सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत आरटीपीसीआर टेस्ट (नमुने) १८ हजार ९९८ घेण्यात आले असून यात ५५८ पाॅझिटिव्ह आलेले आहेत. सद्य:स्थितीत कोरोनाचे कमी रुग्ण आढळून येत असले तरी नागरिकांनी मास्क घालणे सोडून देवून नये. गर्दीच्या ठिकाणी सामाजिक आंतर ठेवावे. कोरडा खोकला, ताप आल्यास आरटीपीसीआर चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

एकाही रिपोटर्टमध्ये क्युरी नाही

जिल्ह्यातील २४ प्राथमिक आरोग्य केंद्र असून इतर आरोग्य संस्था ७ आहेत. जिल्हा रुग्णालयात हिंगोली व अधिनस्त ग्रामीण रुग्णालय, प्रा. आ. केंद्रातून कोरोनाचे नमुने लॅबमध्ये आणली जातात. या लॅबमध्ये नमुन्याची तपासणी योग्यरित्या केली जाते. आजपर्यत तरी एकरी क्युरी आढळून आली नाही. अगदी योग्य प्रकारे कोरोना रुग्णांची तपासणी केली जाते.

लॅबचे पुढे काय?

आजमितीस कोरोना आजाराचे प्रमाण जिल्ह्यात कमी झाले आहे. हा आजार असेपर्यत कोरोना तपासणी होईल. यानंतर सदरील लॅबचा उपयोग इतर आजाराच्या तपासणीकरीता केला जाईल. सध्या तरी जिल्ह्यातून आलेल्या कोरोना रुग्णांची तपासणी केली जात आहे.

-डाॅ. मंगेश टेहरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक

२ कोटी १२ लाख रुपयांचा निधी

कोरोना आजाराने मार्च महिन्याच्या २३ तारखेपासून डोके वर काढले होते. सुरुवातीचे आठ महिने हिंगोली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची चाचणी करण्यासाठी लॅब नव्हती. दुसऱ्या जिल्ह्यात चाचणीकरीता नमुने पाठविले जात. कोरोना आजाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता हिंगोलीकरीता स्वतंत्र एक लॅब मिळाली आहे. रुग्णांच्या तपासणी व इतर बाबीकरीता शासनाने २ कोटी १२ लाखांचा निधी उपलब्ध करुन दिलेला आहे. जेव्हा लॅब सुरु केली आहे तेव्हापासून ती आजपर्यंत बंद पडलेली नसून लॅबची स्वच्छता वेळीच केली जाते.

-डाॅ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक, हिंगोली