शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल-डिझेलच्या दराने किचन कोलमडले; किराणा, भाजीपालाही महागला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:19 IST

हिंगोली : गत दोन-तीन महिन्यांपासून महागाईने कळस गाठला आहे. पेट्रोल-डिझेलच्या दराने शंभरी पार केली आहे. दुसरीकडे भाजीपाला व किराणा ...

हिंगोली : गत दोन-तीन महिन्यांपासून महागाईने कळस गाठला आहे. पेट्रोल-डिझेलच्या दराने शंभरी पार केली आहे. दुसरीकडे भाजीपाला व किराणा वस्तूही महागल्यामुळे किचन कोलमडले गेले आहे.

सद्य:स्थितीत पेट्रोल व डिझेल बरोबरच किराणा व भाजीपाल्यात मोठी वाढ आहे. बाजारपेठेत आजमितीस मूग डाळ ९० रुपये किलो, तूर डाळ ९५ रुपये किलो, हरभरा डाळ ७० रुपये किलो, मसूर डाळ ७० रुपये किलो तर उडीद डाळ ९० रुपये किलो भावाने विकली जात आहे. तेलाचे भाव कमी होण्याऐवजी वाढलेले पाहायला मिळत आहेत. सोयाबीन १४० रुपये किलो, करडई तेल १९० रुपये किलो, सूर्यफूल तेल १६० रुपये किलो, शेंगदाणा तेल १६० रुपये किलो भावाने बाजारात विक्री होत आहे. तसेच गूळ ४० रुपये किलो, साखर ३४ रुपये किलो भावाने विकली जात आहे.

जिल्ह्यात पाणी भरपूर प्रमाणात असल्यामुळे भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकविला जात आहे. भाज्यांची आवक भरपूर प्रमाणात असली तरी भाजी मंडईत भाजीपाला महागला आहे. घासघीस केल्यानंतरच विक्रेते भाज्यांची किंमत थोडीसी कमी करीत आहेत. भाजी मंडईत शेवगा ६० रुपये किलो, आलू १५ रुपये किलो, वांगे ५० किलो, कांदे २० किलो, कोथिंबीर ४० किलो, पत्ता कोबी २० रुपये किलो, फूल कोबी ४० रुपये किलो, चवळी ३० रुपये किलो, टोमॅटो १५ रुपये किलो, काकडी २० रुपये किलो, कारले ४० रुपये किलो भावाने विकले जात आहेत.

शेवगा महागला...

सद्य:स्थितीत शेवग्याची आवक कमी आहे. शेवगा नाशिक जिल्ह्यातून येत आहे. दोन आठवड्यांपूर्वी शेवगा ४० रुपये किलो होता. आजमितीस शेवगा ६० ते ६५ रुपये किलो भावाने विकला जात आहे. पुढे चालून अजून भाव वाढण्याचीही शक्यता आहे.

भाजीपाल्यांचे दर...

शेवगा ६० रुपये किलो

शेवगा ६०

आलू १५

वांगे ५०

कांदे २०

डाळ स्वस्त, तेल महाग...

किराणा बाजारपेठेत तूर, मूग, उडीद, मसूर, हरभरा आदी डाळींचे भाव कमी आहेत; परंतु सोयाबीन, करडई, सूर्यफूल, शेंगदाणा आदी तेलाचे भाव कमी होण्याचे नाव घेत नाही. यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. महागाईने कळस गाठला असून किराणा वस्तूंचे भाव कमी होणे आवश्यक आहे.

घर चालविणे झाले कठीण...

गत तीन-चार आठवड्यांपासून किराणा तसेच भाजीपाला महाग झाला आहे. भाजीपाला स्वस्त होता त्यावेळेस दोन ते तीन भाज्या जेवणात असायच्या; परंतु हल्ली भाजीपाला महाग झाल्याने एकच भाजी ताटात राहत आहे.

-प्राची हरीश पुंडगे, गृहिणी

महागाईमुळे किराणा तसेच भाजीपालाही महागला आहे. २० रुपये किलो भावाने मिळणारी कोथिंबीर सद्य:स्थितीत ४० रुपये किलोने घ्यावी लागत आहे. दोन आठवड्यांपूर्वी शेवगा ४० रुपये किलो होता. आता ६० रुपये भावाने विकत घ्यावा लागत आहे.

-सीमा पिराजी घुगे, गृहिणी

ट्रॅक्टरची शेतीही महागली...

शेती नांगरटीसाठी अनेक शेतकऱ्यांना बैल मिळेना झाले आहेत. त्यामुळे उसने पैसे घेऊन शेतकरी ट्रॅक्टरच्या साह्याने शेती नांगरून घेत आहेत. सध्या पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. त्यामुळे १८०० रुपये देऊन नांगरटी करून घ्यावी लागत आहे. शेतकऱ्यांना हे परवडणारे नाही.

-सुरेश चव्हाण, आडगाव (रंजे)

व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया...

पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यामुळे भाजीपाल्यांची ने-आण करणे कठीण होऊन बसत आहे. महागाईने कळस गाठला असून छोट्या तसेच मोठ्या व्यापाऱ्यांनाही वाहन चालविणे कठीण होऊन बसत आहे.

-शेख मुजीब, भाजी विक्रेता

मोठ्या बाजारपेठेतून साखर, गहू, ज्वारी, सर्व डाळी तसेच तेल विकत आणावे लागत आहे. अशा वेळी मोठे वाहन करावे लागते. पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यामुळे वाहनचालकांनी वाहनांचे भाडेही वाढविले आहे. किराणा व्यापाऱ्यांना परवडणारे नाही.

-नितीन शाहू, किराणा व्यापारी