हिंगोली तालुक्यातील नांदुरा येथील सटवाई देवी मंदिर येथील दानपेटी फोडून पेटीतील अंदाजे २० ते २५ हजार रुपये, एक नथ व पुतळी असे सोन्याचे दागिने तसेच इडोळी येथील महादेव मंदिराची दानपेटी फोडून अंदाजे २० हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला होता. याप्रकरणी पोलिसांनी आदीनाथ शिवाजी हनवते, कृष्णा सूर्यभान जुमडे (दोन्ही रा. आडोळ, ता. सेनगाव) या दोघांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर हिंगोली ग्रामीण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांनी नांदुरा व ईडोळी येथील मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोन्ही गुन्ह्यातील २२ हजार ५०० रुपये रोख व नथ व पुतळी असा १० हजारांचा मुदेमाल जप्त केला. ही कारवाई हिंगोली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक कृष्णकुमार मळघणे, पोलीस उप निरीक्षक किशोर पोटे, यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष वाठोरे यांनी केली.
दानपेटी फोडणाऱ्यांकडून मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:34 IST