शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात यंदाही पोषण पारसबागांसाठी महिला बचत गटांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:20 IST

हिंगोली जिल्ह्यात ७३६१ महिला बचत गट कार्यरत आहेत. यात ७१ हजार ३०० कुटुंबांचा समावेश आहे. मागच्या वर्षी साडेतीन हजारांवर ...

हिंगोली जिल्ह्यात ७३६१ महिला बचत गट कार्यरत आहेत. यात ७१ हजार ३०० कुटुंबांचा समावेश आहे. मागच्या वर्षी साडेतीन हजारांवर परसबागांची निर्मिती केली होती. यंदा ४७५० चे उद्दिष्ट आहे. पहिल्या दोन दिवसांतच २३९ परसबागा उभारून ५ टक्के कामही पूर्ण झाले. राज्यात चौथ्यास्थानी हिंगोली आहे. गेल्यावर्षी बचत गटांना या परसबागेमुळे घरच्या घरी रोज वेगवेगळ्या दोन प्रकारच्या भाज्यांची चव सातही दिवस चाखता आली. त्यामुळे आरोग्यही सुधारले आहे.

ग्रामीण भागात कुपोषण व ॲनेमियामुळे महिलांमध्ये इतर आजारांचेही प्रमाण बळावत आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी प्राेटीन, लोहयुक्त फळभाज्या, पालेभाज्यांची मोठी मदत होते. यासाठी ३३ बाय ३३ जमिनीवर १४ वाफे करून परसबाग तयार केली जाते. यात सात वाफ्यांत पालक, मेथी, शेपू, कोथिंबीर, पानकोबी अशा पालेभाजा तर सात वाफ्यांत भेंडी, टमाटे, वांगी, गवार आदी फळेभाजा लावल्या जातात. तर बागेच्या कडेने वेली लावून जवळपास २० ते २५ भाज्यांचे नियोजन करता येते. तसेच तूळस, कोरफड, गवती चहा अशा आयुर्वेदिक वनस्पतीही लावल्या जातात. याबाबतचे प्रशिक्षणही या महिलांना देण्यात आले आहे. समुदाय संसाधन व्यक्तींना हे प्रशिक्षण दिले. ते इतर बचत गट अथवा सदस्यांना यात मदत करतात.

यंदा सात हजार परसबागांचा संकल्प

यंदा प्रत्येक बचत गटाने किमान एक परसबाग उभारावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गावात बचत गटाच्या महिला सदस्यांपैकी ज्या गरोदर अथवा स्तनदा माता आहेत, अशांना तर ही परसबाग अतिशय उपयुक्त आहे. इतर कोणतेही उपाय न करता या बागेतील भाजीपाल्यावरच त्यांचे योग्य पोषण होऊ शकते.

परसबागेसाठी रोपांची विक्री

पोषण परसबागांना गतवर्षी मिळालेला प्रतिसाद पाहता यंदा कळमनुरी तालुक्यातील मसोड येथील समुदाय संसाधन व्यक्ती सिंधूताई जांबूतकर यांनी यंदा भाज्यांची रोपे तयार केली. यात वांगे, टोमॅटो, मिरची, पानकोबी, फुलकोबी आदींचा समावेश आहे. बचत गटाच्या सदस्यांना ठरावीक किमतीत तर भूमिहीन व गरीब महिलांना चार ते पाच रोपे मोफत देण्यात आल्याचे सांगण्यात आले.