औंढा नागनाथ : साकोळ (तालुका शिरूर अनंतपाळ, जिल्हा लातूर) येथे साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली आहे. या घटनेमुळे मातंग व दलित समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांना त्वरित अटक करावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार कृष्णा कानगुले यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर ममलेश देशमुख, सुमेध मुळे, किरण घोंगडे, रवी डोंगरदिवे, विष्णू पवार, अरविंद मुळे, आकाश सुतारे, विलास मंडलिक, रामराव रणखांबे, भिवाजी सरोदे, गजानन वाखरकर, डॉ. शेख जवळा बाजार, रामा सोनवणे, राजू रणखांबे, श्रीकांत रणखांबे, नीलेश रणखांबे, लखन रणखांबे, गणेश रणखांबे, महेंद्र डांगे, बाळासाहेब साळवे, सागर घनसावंत, बाळासाहेब साळवे, अरविंद मुळे, गजानन वाखरकर, महेंद्र डांगे, चंद्रमुनी मुळे, लखन रणखांबे, नीलेश मुळे, आकाश मुळे, राजू खंडागळे, श्रीकांत रणखांबे, विक्रम सरोदे, अविनाश रणखांबे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
साकोळ येथील घटनेचा अनेकांकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:27 IST