शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

नियमबाह्यरीत्या कामे रोखली तर गाठ माझ्याशी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:20 IST

हिंगोली : जिल्हा परिषदेत अविश्वास ठरावाच्या विरोधात उभे राहणाऱ्या सदस्यांची कामे अडविली जात असून, अशा कामांची प्रशासकीय मान्यता झालेली ...

हिंगोली : जिल्हा परिषदेत अविश्वास ठरावाच्या विरोधात उभे राहणाऱ्या सदस्यांची कामे अडविली जात असून, अशा कामांची प्रशासकीय मान्यता झालेली असताना कोणतेही कारण नसताना काम अडविल्यास गाठ माझ्याशी आहे, असा इशारा आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी दिला. सीईओ आर. बी. शर्मा यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळासह त्यांनी अधिकाऱ्यांची हजेरी घेतली.

अविश्वास ठरावाच्या समर्थनार्थ राहिलेल्या सदस्यांनाच सोबत घेऊन सत्ताधारी कारभार करू लागले आहेत; तर अविश्वासाच्या विरोधात गेलेल्यांनाच आता विरोधक समजले जात आहे. त्यामुळे कामाच्या अडवाअडवीचे प्रकारही घडत आहेत. मात्र त्याला समित्यांचा आधार दिला जात आहे. बहुमतापुढे विरोधकांना हात टेकावे लागत आहेत. प्रशासन विविध कारणे सांगून वेळ मारून नेत असल्याचा आरोप करीत सदस्यांनी आ. तान्हाजी मुटकुळे यांना साकडे घातले. आ. मुटकुळे यांनी मंगळवारी सीईओ आर. बी. शर्मा यांची भेट घेतली. त्यांच्यासमोर विविध कामांची यादीच सादर करून ही कामे निविदेत आल्यावर का राेखली? असा सवाल केला. त्यावर शर्मा यांनी संबंधित विभागप्रमुखांना पाचारण केले. त्यामध्ये बांधकामचे कार्यकारी अभियंता लवेश तांबे यांना सदस्यांनी ही कामे थांबविण्याचे कारण विचारले असता, अध्यक्षांनी तसे पत्र दिल्याचे सांगितले. तर आम्हाला तसे लेखी द्या, असे सांगितले असता ‘दोन दिवसांत सांगतो,’ असे उत्तर दिले. शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनीही ‘समितीने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे कारवाई केली जाते. मी माझे मत मांडू शकतो,’ असे उत्तर दिले; तर मुख्य लेखा व वित्त अधिकारी मनोज पाते यांनाही मार्च एंडच्या मुद्द्यावरून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला असता त्यांनीही मार्च एंड संपल्याचे सांगितले. यावेळी माजी सभापती रत्नमाला चव्हाण, सदस्या सुवर्णमाला शिंदे, शिवहार नरवाडे, विलास रायवाडे, आदींची उपस्थिती होती.

सीईओंचे टिपिकल उत्तर

या सर्व प्रकारात सीईओ आर. बी. शर्मा यांनी मी आपल्या सर्वांच्या तक्रारींवर नियमानुसारच कामे करण्याचे पत्र दिल्याचे सांगितले; तर विषय समितीचा निधी नियोजनाचा हक्क आहे. त्यात विभागप्रमुख सचिव या नात्याने मत मांडू शकतात. सध्या जे वातावरण आहे, ते माहितीच आहे, असे सांगितले. त्यांनी थेट विभागप्रमुखांनाच समोर केल्याने या तक्रारींचे काय होणार? हे सांगायची गरज नाही.

... तर १ तारखेला पुन्हा भेटणार

जर ३० जूनपर्यंत सदस्यांच्या या पत्रांचा विचार करून त्यावर निर्णय झाला नाही तर १ तारखेला पुन्हा आपल्या भेटीला येणार आहोत. बेकायदेशीर कामे केल्यास गाठ माझ्याशी आहे. विधिमंडळात यावर प्रश्न उपस्थित करण्याचा इशारा आ. मुटकुळे यांनी दिला.

गटनेता बदलाचे पत्र

सध्या जिल्हा परिषदेत भाजपचे गटनेतेपद पुष्पाताई प्रकाशराव थोरात यांच्याकडे आहे. मात्र आज भाजपच्या नऊ सदस्यांच्या स्वाक्षरीसह जिल्हाध्यक्षांकरवी गटनेतेपदी शिवहार नरवाडे यांची निवड केल्याचे पत्र सामान्य प्रशासन विभागास देण्यात आले.