शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

फळबाग योजनेला जाचक अटींचे काटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 00:29 IST

जिह्यात कृषि विभागातर्फे सन २०१८-१९ मध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी केवळ १.८० कोटीच रूपये मंजूर झाले आहे. शासकीय अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मात्र यात यापूर्वी मग्रारोहयोत फळबाग केलेयांना प्राधान्य असल्याने नव्यांचा हिरमोड होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिह्यात कृषि विभागातर्फे सन २०१८-१९ मध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी केवळ १.८० कोटीच रूपये मंजूर झाले आहे. शासकीय अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मात्र यात यापूर्वी मग्रारोहयोत फळबाग केलेयांना प्राधान्य असल्याने नव्यांचा हिरमोड होत आहे.खरेतर या योजनेत राज्यासाठी १00 कोटी रुपये जाहीर होवून पूर्ण जून महिना लोटला. अर्ज वेबसाईटवर टाकयला अर्धा जुलै लागला. त्यातही आॅनलाइनची तांत्रिक अडचण अर्ज दिसूच देत नाही. हिंगोली हा मागास जिल्हा आहे. सिंचन क्षेत्रही अल्प आहे. आता १.८0 कोटींत किती जणांचे समाधान होणार हा प्रश्नच आहे. या योजनेसाठी आंबा कलम प्रति हेक्टरी १०० झाडांसाठी अनुदान मर्यादा रुपये ५३ हजार ५६१, आंबा कलमासाठी १ लाख १ हजार ९७२ , काजू कलमे साठी ५५ हजार ५७८, पेरु कलमे सधन लागवडीसाठॅ २ लाख २ हजार ९०, पेरू कलमेसाठी ६२ हजार २५३, डाळिंब कलमेसाठी १ लाख ९ हजार ४८७, संत्रा- मोसंबी कागदी लिंबू कलमे ६२ हजार ५७८, संत्रा कलमे इंडो-इस्त्राईल तंत्रज्ञान ९९ हजार ७१६ , ५९ हजार ६२२, नारळ रोपे बाणावल- ५९ हजार ६२२ , नारळ रोपे टी/डी- ६५ हजार २२ , सीताफळ कलमे- ७२ हजार ५३१, आवळा कलमे - ४९ हजार ७३५ , चिंच कलमे - ४७ हजार ३२१ ,जांभूळ कलम- ४७ हजार ३२१, कोकम कलम- ४७ हजार २६०, फनस कलमे-४३ हजार ५९६ , अंजीर कलमे- ९७ हजार ४०६ , चिकू कलम- ५२ हजार ६१ रुपये प्रतिहेक्टरी कमाल अनुदान मिळणार आहे.योजनेच्या जाचक अटीसर्व प्रवर्गाअंतर्गत ज्या शेतकºयांच्या कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून आहे. त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल व त्यानंतर अन्य शेतकºयांचा विचार करण्यात येईल. कुटुंबाची व्याख्या - पती पत्नी व अज्ञान मुले!, महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये पात्र असणाºयांना या नरेगाच्या योजनेचा प्रथम फायदा घेतल्यानंतरच उर्वरित क्षेत्रासाठी भाऊसाहेब फुंडकर फळभाग लागवड योजनेमधून लाभ घेता येईल, प्रत्येक तालुक्यात प्राप्त होणाºया आर्थिक लक्षांकाच्या मर्यादेत योजनेच्या निकषानुसार पात्र लाभार्थ्याची निवड होेईल, लाभर्थ्याना कृषी विद्यापीठांनी कृषी हवामान क्षेत्राकरिता शिफरस केलेल्या फळपिकांच्या वाणांची व अंतराच्या शिफारसीनुसार लागवड करणे बंधनकारक राहील, योजनेअंतर्गत केवळ कलमांच्या लागवडीला नारळ वगळता अनुदान देय राहील, फळपिकांची कलमे रोपे प्राधान्याने शसकीय, कृषी विद्यापीठ, राष्टÑीय संशोधन संस्था व राष्टÑीय बागवानी मंडळ मानांकित रोपवाटिकेतूनच घेणे बंधनकारक राहील, लाभार्थ्यांना शसकीय वा कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिकेतील उपलब्ध कलमे/रोपे उधारीवर देण्यात यतील.अनुदान थेट संबंधित संस्थेस अदा करण्यात येईल, राष्ट्रीय बागवानी मंडळ मानांकित रोपवाटिकेतील कलमे/ रोपांच्या गुणवत्तेची जबाबदरी संबंधित रोपवाटिकाधारकांची यराहील. सदर रोपवाटिकेतून लाभार्थ्यांनी स्वताच्या जबाबदारीवर कलमे/ रोपे खरेदी करावीत तथापि, कलमे/ रोपांचे अनुदान लाभार्थ्यांचा आधार संलग्न बॅक खात्यावर जमा करण्यात येईल, अशा अनेक अटी घातलेल्या आहेत.

टॅग्स :agricultureशेतीgovernment schemeसरकारी योजना