शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीतही साडेचार कोटीच्या धान्याचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:28 IST

हिंगोली : तालुक्यात जानेवारी ते जुलै २०१९ या काळात ११ हजार ३७७ क्विंटल गहू व ४ हजार ८९० क्विंटल ...

हिंगोली : तालुक्यात जानेवारी ते जुलै २०१९ या काळात ११ हजार ३७७ क्विंटल गहू व ४ हजार ८९० क्विंटल तांदूळ अशा १६ हजार २६७ क्विंटलची अनियमितता झाली असून, यातील दोषी संबंधितांवर कारवाईची मागणी विराट लोकमंचच्या शेख नईम शेख लाल यांनी केली आहे. यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालाचा दाखला दिला आहे. तर प्रशासनाकडून यात संबंधितांचे खुलासे प्राप्त झाल्यानंतर विभागीय आयुक्तांना कारवाईचा अहवाल पाठविला जाईल, असे सांगण्यात आले.

दिलेल्या तक्रारीत म्हटले की, जानेवारी ते जुलै २०१९ या कालावधीत ऑफलाईन पद्धतीने नियतनापेक्षा जास्त ११ हजार ३७७ क्विंटल गहू व ४ हजार ८९० क्विंटल तांदूळ असे एकूण १६ हजार २६७ क्विंटल धान्याचा जास्तीचा पुरवठा केला. याचाी बाजारभावाने ४.६१ कोटी रुपये एवढी किंमत होते. यामुळे पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्य लाभापासून वंचित केले. उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी दिलेल्या अहवालात ही बाब स्पष्ट झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या अहवालात ऑनलाईन वितरणातील आकडेवारी विचारात न घेता नियतन मंजूर करणे, मंजूर केलेल्या नियतनाच्या तुलनेत रास्त दुकानदारांना अधिकचे वाटप करणे, पुरवठाविषयक अभिलेखे अद्ययावत न ठेवणे, या सर्व बाबी विचारात घेता कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमताने सदरील अनियमितता केली आहे. या निष्कर्षाप्रत ही चौकशी समिती आलेली आहे, असेही म्हटले आहे. याबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करून या रकमेची वसुली करावी, अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले, या प्रकरणाची चौकशी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली. यात तत्कालीन तहसीलदारांची विभागीय चौकशीही लावली. विभागीय आयुक्तांकडे कारवाईचा प्रस्तावही पाठविण्यात आला होता.

याबाबत पुरवठा अधिकारी अरुणा संगेवार यांना विचारले असता त्या म्हणाल्या, या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर त्याचा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाला पाठवून कारवाई प्रस्तावित केली होती. मात्र या अहवालात काही त्रुटी आढळल्याने तो परत आला होता. आता पुन्हा त्या त्रुटी दूर करण्यासाठी फेरचौकशी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत झाली. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून संबंधितांना नोटिसा बजावून खुलासे मागविले आहेत. हे खुलासे प्राप्त झाल्यानंतर त्यावरून विभागीय आयुक्त कार्यालयाकडे कारवाई प्रस्तावित करण्यात येईल.