शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दोन घरे फोडून सव्वा लाखाचा ऐवज पळविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:27 IST

शहरातील बळसोंड भागातील रामाकृष्णा सीटी प्लॉट नं १९१ मध्ये पळसी ता सेनगाव येथील नारायण उत्तमराव बांगर हे राहतात. २० ...

शहरातील बळसोंड भागातील रामाकृष्णा सीटी प्लॉट नं १९१ मध्ये पळसी ता सेनगाव येथील नारायण उत्तमराव बांगर हे राहतात. २० जानेवारी रोजी ते घरी नव्हते. घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी घराचा कुलूप कोंडा तोडून घरात प्रवेश केला. तसेच कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख २२ हजार रुपये तसेच विक्रीसाठी ठेवलेले रेडीमेड कपडे असा जवळपास १ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला. त्यानंतर चोरट्यांनी प्रभाकर केशव गुठ्ठे यांच्या घरी चोरी केली. त्यांच्या घरातून दहा हजार रुपये किमतीची तीन ग्रॅम सोन्याची काळ्या मण्याची पोत लाबविली. याप्रकरणी नारायण बांगर यांच्या फिर्यादीवरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

भरधाव कारच्या धडकेत दूधविक्रेत्यांचे नुकसान

हिंगोली : भरधाव कारने दूधविक्रेत्याच्या दुचाकीला धडक दिल्याने पाच ते सहा दूधविक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना २१ जानेवारी रोजी सकाळी शहरातील गणपती चौक परिसरात घडली. शहरातील गांधी चौक ते गणपती चौक परिसरात दूधविक्रेते बसतात. जवळपासच्या गावातील दूधविक्रेते येत असल्याने या भागात दूधविक्रेत्यांची मोठी गर्दी असते. २१ जानेवारी रोजीही सकाळच्या सुमारास काही दूधविक्रेते दूध विक्रीसाठी दुचाकीसह थांबले होते. याच वेळी एक भरधाव कार आली. वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारचा धक्का पाचे ते सहा दूधविक्रेत्याच्या दुचाकीला लागला. यात जीवित्तहानी झाली नसली तरी कॅनमधील दूध रस्त्यावर सांडले होते. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.