शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत २० लाखांचा गुटखा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:34 IST

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : दोन ट्रकसह ४५ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त हिंगोली : येथील हिंगोली ते नांदेड ...

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : दोन ट्रकसह ४५ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त

हिंगोली : येथील हिंगोली ते नांदेड मार्गावरील सावखेडा गावाजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल २० लाख ४५ हजारांचा गुटखा जप्त केला. ही कारवाई २२ सप्टेंबर रोजी करण्यात आली. याप्रकरणी ८ जणांवर बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मध्यप्रदेशातून एका ट्रकमध्ये गुटख्याची पोते नांदेडकडे नेली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, अभय माकणे, भाग्यश्री कांबळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बालाजी बोके, संभाजी लेकुळे, राजू ठाकूर, विठ्ठल कोळेकर, नितीन गोरे, सुनील अंभोरे, जावेद शेख, शंकर ठोंबरे , किशोर सावंत, विठ्ठल काळे, प्रशांत वाघमारे, आकाश टापरे, सुमित टाले, रोहित मुदीराज यांच्या पथकाने २२ सप्टेंबर रोजी दुपारपासून वाहनांची तपासणी सुरु केली होती.

यावेळी एम.पी.०९ एच.जी. ०९५६ क्रमांकाचा ट्रक थांबवून पोलिसांनी चालकाकडे ट्रकमधील मालाविषयी चौकशी केली. मात्र चालकास पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे देता आली नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी सदर ट्रक ताब्यात घेऊन बासंबा पोलीस ठाण्यात लावला. त्यानंतर पोलिसांनी ट्रकमधील साहित्याची तपासणी केली असता त्यात इतर साहित्यासह विविध कंपनीचा २० लाख ४५ हजारांचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी गुटख्याच्या मालासह ४५ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बालाजी बोके यांच्या फिर्यादीवरून चालक बाबूलाल नथूलाल कुशवाह (रा. रूस्तुमपूर जि. खंडवा), क्लिनर भीम फुलचंद तडवी (रा. रुस्तुमपूर, जि. खंडवा, मध्यप्रदेश), शेख फैजान (रा. इंदौर), महमद फारुख महमद शफी (रा. इंदौर), विकी चौरसिया ( रा. इंदौर), सलीम गोल्डन जर्दाचे व्यापारी, अकबर चाऊस, खयूम (पूर्ण नाव माहित नाही रा. नांदेड) याचे विरुद्ध बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोलीस निरीक्षक उदय खंडेराय करीत आहेत.