शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

जवळा बाजार येथे सव्वा लाखाचा गुटखा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:20 IST

जवळा बाजार येथील एका गोदामात शासनाने प्रतिबंधित केलेला गुटख्याचा साठा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार ...

जवळा बाजार येथील एका गोदामात शासनाने प्रतिबंधित केलेला गुटख्याचा साठा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार प्रभारी पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पो.नि.उदय खंडेराय, पोउपनी किशोर पोटे, सपोउपनि बालाजी बोके, पोह. संभाजी लकुळे, भगवान आडे, विठ्ठल कोळेकर, पोना शंकर ठोंबरे राजू ठाकूर, पोशि किशोर सावंत, ज्ञानेश्वर सावळे, चापोशि शेख जावेद, प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने २६ जून रोजी दुपारी जवळा बाजार येथील एका गोदामावर छापा टाकला. यावेळी या बसथांबा परिसरातील एका गोदामात शासनाने प्रतिबंधित केलेला १ लाख ३९ हजार २५ रुपये किमतीचा माणिकचंद, गोवा, सुगंधी विमल केशर युक्‍त पान मसाला, सुगंधी राज निवास पान मसाला, सुगंदी पान पराग आदी नावाचा गुटखा आढळून आला. तपासात हा गुटखा सुभाष किसनराव लुटे (रा.माळेगल्ली शिरड शहापूर हा.मु. जवळा बाजार) याचा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी गुटख्याचा साठा जप्त केला असून, याप्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.

दोन दिवसांत दुसरी कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २५ जून रोजी कळमनुरी तालुक्यातील डिग्रस बु. येथे छापा टाकून ७१ हजार रुपये किमतीचा गुटख्याचा साठा जप्त केला होता. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी तब्बल १ लाख ३९ हजार २५ रुपये किमतीचा साठा जप्त केला. या कारवाईमुळे गुटखा विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

फोटो : ३५