शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

‘माझी वसुंधरा’चे हिंगोली पालिकेला ५ कोटींचे पहिले बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:22 IST

ऑनलाईन बक्षीस वितरण कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री हसन मुश्रीफ, आदित्य ठाकरे, संजय सोनवणे, सचिव मनीषा ...

ऑनलाईन बक्षीस वितरण कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री हसन मुश्रीफ, आदित्य ठाकरे, संजय सोनवणे, सचिव मनीषा म्हैसेकर आदींची उपस्थिती होती. राज्यातील २२२ नगरपालिकांनी या अभियानात सहभाग नोंदविला होता. त्यातून पहिले बक्षीस पटकावण्याची किमया हिंगोली पालिकेने साधली आहे.

हिंगोली नगरपालिकेला यापूर्वी स्वच्छता अभियानातील विविध स्वरुपाचे तीन पारितोषिके मिळाली. घरकुल योजनेतही पुरस्काराचा मानकरी ठरली. यात आता माझी वसुंधरा अभियानात प्रथम आल्याने आणखी एक मानाचा तुरा शिरपेचात खोवला आहे. या ऑनलाईन कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे, नगरसेवक बिरजू यादव, आरेफ लाला, चंदू लव्हाळे, श्याम माळवटकर, स.सनोबर, बाळू बांगर, ठाकूर यांच्यासह न.प.चे कर्मचारी हजर होते.

फटाके फोडून जल्लोष

हिंगोली पालिकेला राज्यस्तरीय पहिले बक्षीस जाहीर झाल्यानंतर फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष बांगर, चव्हाण, कुरवाडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. मागील चार ते पाच वर्षांत झालेल्या विविध कामांमुळे शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे. त्यातच इतर उपक्रमांमध्येही पालिका मागे नाही. त्यामुळे विविध प्रकारची बक्षीसे दरवर्षी मिळत आहेत. त्यामुळे विकासालाही हातभार लागत आहे. काही बक्षीसांमध्ये निधीही असल्याने त्याचा शहराच्या विकासासाठी उपयोग होत असल्याचे बांगर व चव्हाण यांनी सांगितले.

फोटो फाईल नेम ०५ एचएनएलपी १३ - हिंगोली पालिकेला पहिले पारितोषिक मिळाल्याने फटाके फोडून जल्लोष करताना नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे, नगरसेवक बिरजू यादव, आरेफलाला, चंदू लव्हाळे आदी.