शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

हिंगोली लोकसभेवरून रंगले कार्यकर्त्यांमध्ये फेसबूकवॉर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 23:46 IST

लोकसभा मतदारसंघात वंचित आघाडी वगळता कोणाचाही उमेदवार जाहीर झाला नसल्याने जागा कोणत्या पक्षाला जाईल? उमेदवार कोण राहील? याबाबत फेसबूकवर चर्चा झडताना दिसत आहेत. त्यातच मतदारसंघ सेनेऐवजी भाजपला सुटल्याच्या चर्चांनी वातावरण अधिकच गढूळ झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लोकसभा मतदारसंघात वंचित आघाडी वगळता कोणाचाही उमेदवार जाहीर झाला नसल्याने जागा कोणत्या पक्षाला जाईल? उमेदवार कोण राहील? याबाबत फेसबूकवर चर्चा झडताना दिसत आहेत. त्यातच मतदारसंघ सेनेऐवजी भाजपला सुटल्याच्या चर्चांनी वातावरण अधिकच गढूळ झाले.हिंगोली लोकसभा मतदारसंघाची रचना आधीच विचित्र आहे. विदर्भातील दोन तालुके, नांदेड जिल्ह्यातील चार अन् हिंगोलीचे पाच अशा ११ तालुक्यांचा विस्तार. निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीपर्यंत तर इच्छुकांची एवढी मांदियाळी होती की, सर्वच पक्ष इच्छुकांना कसे समजवायचे या विवंचनेत होते. मात्र आचारसंहिता लागू झाली अन् अनेकांनी तलवार म्यान केली. काहींनी उगाचच खळखळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र ठोस भूमिका जाहीर केली नाही. त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार अजूनही निश्चित होताना दिसत नाही. खरेतर लढत द्यायची असेल तर सेनेने अगोदर उमेदवार जाहीर करणे क्रमप्राप्त होते. तसे तर झाले नाही. मात्र आज नवीनच चर्चांना तोंड फुटले. भिवंडीची जागा सेनेला देवून हिंगोलीची जागा भाजप घेणार असल्याच्या वावड्या उठत होत्या. ही बाब फेसबूकवरही झळकत आहे. त्यात अ‍ॅड.शिवाजी जाधव व आ.तान्हाजी मुटकुळे यांच्या उमेदवारीचीही चर्चा होत होती. मात्र दुसरीकडे सातव लढणार नसल्याच्या काही वाहिन्यांच्या बातम्यांचा दाखला देत जाधव हे काँग्रेसचे उमेदवार असल्याचे काहीजण सांगत सुटले होते. अशातच हिंगोलीची जागा भाजपलाच सुटली अन् आयएएस राहिलेले राधेश्याम मोपलवार हे उमेदवार असल्याच्या वावड्याही सायंकाळी सुरू झाल्या.या मतदारसंघात काँग्रेसकडून विद्यमान खा.राजीव सातव यांचा दावा मजबूत असल्याने त्यांच्याऐवजी इतर कोणाचा विचार त्यांच्या संमतीशिवाय होणे शक्य वाटत नाही. मात्र काँग्रेसचा उमेदवार बदलतो की काय? अशा द्विधेत सेनेकडूनही उमेदवारी निश्चित होताना दिसत नाही. त्यात आता थंड बसलेली भाजपीय मंडळी पुन्हा जागी झाली आहे. भिवंडीचा दाखला देवून तेही पुन्हा जागेवर दावा करू लागले आहेत. त्यामुळे अशी प्रचंड रोमांचक स्थिती निवडणुकीचा फड रंगण्यापूर्वीच निर्माण झाली आहे. निवडणुकीला प्रत्यक्ष सुरुवात झाल्यावर तर कशा व किती वेगवान घडामोडी घडतील, हे सांगणेच अवघड आहे.

टॅग्स :Politicsराजकारणlok sabhaलोकसभा