शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

देशीदारूचे दुकान हद्दपार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:27 IST

कळमनुरी शहरात दोन देशी दारूची दुकाने आहेत. एक देशी दारूचे दुकान हे नवीन बसस्थानकाजवळ भरवस्तीत आहे. येथे मुस्लिम धर्मीयांचे ...

कळमनुरी शहरात दोन देशी दारूची दुकाने आहेत. एक देशी दारूचे दुकान हे नवीन बसस्थानकाजवळ भरवस्तीत आहे. येथे मुस्लिम धर्मीयांचे प्रार्थनास्थळ व बंजारा समाजाचे जगदंबा मंदिर व संत रामचंद्र महाराजांचे मंदिर आहे. या देशी दारू दुकानातील दारुड्यांचा त्रास ये - जा करणाऱ्या शाळकरी मुली व महिलांना नेहमीच होताे. तसेच संपूर्ण तालुक्यात खेडोपाडी देशी दारूचे बॉक्स दररोज मोठ्या प्रमाणात येथून विक्री हाेतात. शासनाने नेमून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ दुकान उघडे ठेवून बेकायदेशीर दारू विक्री चालूच असते. शहरातील दोन्ही देशी दारूची दुकान ही एकाच कुटुंबाच्या मालकीचे आहेत. दुसरे देशी दारू दुकानदारही आपल्या हस्तकामार्फत बेकायदेशीरपणे खेडोपाडी देशी दारूचे बॉक्स विक्री करीत आहेत. गोरगरीब, नवयुवक, मजूर आदीचे आयुष्य या देशी दारूमुळे उध्वस्त होत आहे. कळमनूरी शहरातून ही देशी दारूचे दुकान कायमची हद्दपार करावी, अशी मागणी महिलांच्या वतीने करण्यात आली आहे. जोपर्यंत शहरातील देशी दारूचे दुकान येथून कायमचे हद्दपार होत नाही, तोपर्यंत लढा कायम ठेवणार असल्याचे महिलांनी सांगितले.

महिलांच मोर्चा नवीन बसस्थानक येथून हिंगोली ,नांदेड या मुख्य रस्त्याने तहसील कार्यालयापर्यंत पोहोचला. यादरम्यान महिलेच्या हातात देशी दारू शहरातून हद्दपार करण्या करिताचे व देशी दारू बंद करण्याबाबत विविध घोषणाचे फलकही मोर्चेकरी महिलांच्या हातात दिसून आले. महिला मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार श्रीराम पाचपुते यांना दिले. शहरातील दारूचे दुकान हटवाण्यासाठी महिला चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. मोर्चात मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग होता. या निवेदनावर अजीज पठाण, श्वेता जुने, उषा सोनूने, प्रिया चौधरी, दुर्गा चौधरी, वनिता चाैधरी, सुनीता वाढणकर, वंदना चौधरी, मीरा चौधरी, पूजा स्वामी, मालुबाई लिंबाळकर, वनिता पत्रे, सारिका जुने, कमलबाई चौधरी, सुमनबाई गडदे, शीला अलदुर्गे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. फाेटाे नं. ०४