शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘महावितरण’च्या कार्यालयांना विजेेचे धक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:27 IST

हिंगाेली : जिल्हाभरात असलेल्या महावितरण कंपनीच्या बहुतांश कार्यालयांची दुरवस्था झाली आहे. इलेक्ट्रिक ऑडिट दरवर्षी केले जात असल्याचा दावा ...

हिंगाेली : जिल्हाभरात असलेल्या महावितरण कंपनीच्या बहुतांश कार्यालयांची दुरवस्था झाली आहे. इलेक्ट्रिक ऑडिट दरवर्षी केले जात असल्याचा दावा महावितरण करीत असले तरी अनेक कार्यालयांतील लाईट फिटिंगच्या सुमार कामामुळे सुमारे ४९५ कर्मचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

जिल्हाभरात महावितरण कंपनीची ३२ कार्यालये आहेत. यामध्ये पाच उपविभाग, तर २८ शाखा कार्यालयांचा समावेश आहे. तसेच ३२ कार्यालयांतून सुमारे ८३६ पदे मंजूर आहेत. मात्र सध्या ४९५ कर्मचाऱ्यांना महावितरणचा डोलारा सांभाळावा लागत आहे. यातही अनेक ठिकाणच्या कार्यालयांची दुरवस्था झाली आहे. बाहेरून इमारती चांगल्या दिसत असल्या तरी भिंतींना तडे गेल्याचे पाहावयास मिळत आहे. तसेच कार्यालय परिसरात काटेरी झुडपे तयार झाली आहेत. रात्रीच्या वेळीही अनेक कर्मचारी कर्तव्यावर असतात. त्यांना जीव मुठीत धरून कामे करावी लागत आहेत. दरवर्षी कार्यालयांची रंगरंगोटी केली जात नसल्याने ती विद्रूप झाली आहेत. त्यातच मोडकेतोडके फर्निचर, पुरेशा सुविधा नसल्याने कर्मचाऱ्यांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. महावितरण दरवर्षी इलेक्ट्रिक ऑडिट करीत असल्याचा दावा करीत आहे. मात्र, बहुतांश ठिकाणी फिटिंग केलेल्या वायर लाेंबकाळत आहेत. यामुळे विविध कार्यालयांत कामे करणाऱ्या तब्बल ४९५ कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे.

जिल्ह्यात महावितरणची कार्यालये

३२

महावितरणचे अधिकारी, कर्मचारी

४९५

कार्यालयाचा रिॲलिटी चेक

जवळा बाजार

औंढा तालुक्यातील जवळा बाजार येथील ३३ के. व्ही. उपकेंद्राची दुरवस्था झाली आहे. इमारत जुनी झाल्याने धोका निर्माण होत आहे. इमारतीत साहित्य ठेवण्यासाठी सुविधा नसल्याने साहित्य अस्ताव्यस्त पडले आहे. साहाय्यक अभियंता कार्यालयात नियमित उपस्थित राहत नसल्याने त्यांच्याशी संपर्क साधणे कठीण होत आहे.

कुरुंदा ३३ के.व्ही. उपकेंद्र इमारत

वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील ३३ के.व्ही. इमारत १९८२ मध्ये उभारण्यात आली. ३९ वर्षे झाल्याने ती जीर्ण झाली आहे. इमारतीमधील फरशी उखडली असून इमारतीला भगदाड पडले आहे. पावसाळ्यात छतातून पाणी झिरपत असते. इमारतीच्या खिडक्यांची तावदाने फुटले आहेत. यंत्रसामग्री जुन्या झाल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे.

नियमित इलेक्ट्रिक ऑडिट

जिल्ह्यातील महावितरणच्या कार्यालयांचे नियमित इलेक्ट्रिक ऑडिट केले जाते. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाते. तसेच कार्यालयांच्या सर्व इमारती सुस्थितीत आहेत.

- श्रीमती देशमुख,

महावितरण कार्यालय.