शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत संचारबंदीमुळे शुकशुकाट; ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 18:09 IST

शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या इंदिरा गांधी चौक ते महात्मा गांधी चौक परिसरात, जवाहर रोड, अकोला रोड, अग्रसेन चौक आदी परिसरांत शुकशुकाट होता

हिंगोली : जिल्ह्यात लागू केलेल्या संचारबंदीमुळे व्यापारपेठ बंद असून शहरात ठिकठिकाणी पोलीस दलातर्फे फिक्स पॉइंट लावून चोख बंदोबस्त ठेवला आहे. विनाकारण फिरणाऱ्यांना पोलीस विचारणा करीत असून तसेही नागरिक बाहेर पडत नसल्याचे चित्र आहे.

कोरोनाचा कहर अचानक वाढला असून त्यातच हिंगोलीतील रुग्णसंख्या दीडशे ते दोनशेच्या घरात गेली. त्यामुळे हिंगोलीकरांची घाबरगुंडी उडाली असून कोणी घराबाहेर पडताना दिसत नाही. पुन्हा एकदा नागरिकांनी कोरोनाची धास्ती घेतली असल्याचे दिसून येत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या इंदिरा गांधी चौक ते महात्मा गांधी चौक परिसरात, जवाहर रोड, अकोला रोड, अग्रसेन चौक आदी परिसरांत शुकशुकाट पाहायला मिळत होता. हिंगोलीत केवळ रुग्णालये व बँका सुरू असल्या, तरी या ठिकाणीही ग्राहक यावेळी फिरकत नसल्याचे दिसून आले. शासकीय कार्यालयांमध्येही कर्मचाऱ्यांशिवाय इतर अभ्यागतांची संख्या फारशी नव्हती.

संचारबंदीतही सकाळच्या वेळी मात्र काहींनी प्रवासाचा प्रयत्न केला. अशांना ठिकठिकाणी फिक्स पॉइंटवरील पोलिसांनी अडवून विचारणा केली. शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी व परवानाधारकांनाच जाऊ दिले जात होते. इतर अनेकांना माघारी फिरण्याची वेळ आली. दुपारनंतर मात्र उन्हाचा पारा वाढताच बाजारातच नव्हे, तर गल्लीबोळांतही कुणी बाहेर फिरकत नसल्याने शुकशुकाट पसरला होता.

बससेवाही बंदकोरोनामुळे बससेवा बंद असल्याने अनेकांना आज इतर जिल्ह्यांत जाता आले नाही. इतर जिल्ह्यांतून येणाऱ्या बस स्थानकात येत होत्या. या ठिकाणी उतरलेल्या प्रवाशांचीही ॲण्टीजेन चाचणी करण्यात येत होती. परजिल्ह्यांतून येणारे प्रवासीही त्या संख्येत नसल्याचे दिसून येत होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHingoliहिंगोली