जिल्ह्यात हिंगोली, वसमत आणि कळमनुरी असे एस. टी. महामंडळाचे तीन आगार आहेत. कळमनुरी आगार वगळता वसमत आगारातून वसमत ते हैदराबाद आणि हिंगोली आगारातून हिंगोली ते हैदराबाद अशा दोन एस. टी. बसेस सोडण्यात येतात. मार्च २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव सर्वत्र झाला होता. त्यानंतर चार महिने बसेस बंद होत्या. हिंगोली आगारात सद्य:स्थितीत १२१ चालक, १२१ वाहक, वसमत आगारात १२० चालक, १३२ वाहक आणि कळमनुरी आगारात ६५ चालक व ७७ वाहक आहेत. वसमत आगारातून २ फेऱ्या व हिंगोली आगारातून २ फेऱ्या (येणे-जाणे) केल्या जातात. १ मार्च ते ७ मार्चदरम्यान परराज्यातील एस. टी.ची सेवा बंद पूर्णत: बंद होती. चालक-वाहकांना ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता जाहीर केला होता. परंतु जाहीर केल्याप्रमाणे तो अजूनही मिळाला नाही. प्रोत्साहन भत्याच्य प्रतीक्षेत सध्या चालक-वाहक दिसून येत आहेत. ऑगस्ट २०२० पासून महामंडळाच्या बसेस सुरू होत्या. यादरम्यान जिल्हा प्रशासनाने आदेश दिल्यानंतर काही दिवस बंद होत्या. आजपर्यंत १५० फेऱ्या या परराज्यात झालेल्या आहेत. १ मार्च ते ७ मार्च २०२१ दरम्यान परराज्यातील एस. टी, सेवा बंद होती.
box
कोरोनाकाळात तिन्ही आगारांतील चालक-वाहकांनी काम केले आहे. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे तीनशे रुपयेप्रमाणे प्रोत्साहन भत्ता वाटप करणे गरजेचे आहे. परंतु तो जाहीर केलेला प्रोत्साहन भत्ता अजूनही मिळालेला नाही. लवकर वाटप केल्यास चालक-वाहकांना लाभ होईल.
-डी. आर. दराडे, एस. टी. कामगार सेना विभागीय सचिव
कोरोनाकाळात चालक-वाहकांना ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता जाहीर केलेला आहे. परंतु, ही सर्व प्रक्रिया वरिष्ठ स्तरावर झाली आहे. अजून तरी जिल्ह्यातील वसमत, हिंगोली आणि कळमनुरी या आगारांतील चालक-वाहकांना प्रोत्साहन भत्ता अजून तरी मिळालेला नाही. प्रोत्साहन भत्ता आल्यास वाटप केला जाईल.
नागोराव चौधरी, सहा. वाहतूक निरीक्षक, हिंगोली