शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

राऊंडच्या नावाखाली डॉक्टरच गायब ! हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयातील चित्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 19:50 IST

१०.२५ वाजेच्या सुमारास सर्जन विभागास भेट दिली असता दोन डाॅक्टरांपैकी एकही डाॅक्टर या ठिकाणी हजर नव्हता.

ठळक मुद्देवेळेत तडजोड होणार नाही- जिल्हा शल्यचिकित्सक

हिंगोली : सरकारी दवाखान्यातील पाच महत्वाच्या विभागातील एक विभाग वगळता इतर चारही डाॉक्टर मात्र गायब असल्याचे सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास गायब असल्याचे पहायला मिळाले.

सरकारी दवाखान्यातील अस्थिरोग, सर्जन, स्त्रीरोग, बालरोग आणि फजिशियन हे अति महत्वाचे विभाग आहेत.  अस्थिविभागास सकाळी १०.२० वाजता भेट दिली  असता एक डाॅक्टर या ठिकाणी रुग्णाची तपासणी करताना आढळून आले. यानंतर १०.२५ वाजेच्या सुमारास सर्जन विभागास भेट दिली असता दोन डाॅक्टरांपैकी एकही डाॅक्टर या ठिकाणी हजर नव्हता.  यानंतर १०.३५ वाजता स्त्रीरोग विभागास भेट दिली असता येथेही डाॅक्टर हजर नव्हते.  डाॅक्टर कुठे गेले आहेत, केव्हा येेतील असे विचारले असता आम्हाला माहिती नाही, थोड्या वेळात येवून जातील, असे उपस्थित परिचारिकेने सांगितले. बालरोग विभागात चार डाक्टरांची नियुक्ती केलेली आहे. परंतु, सकाळी १०.४० वाजता येथे एकही डाॅक्टर उपस्थित नव्हते. 

यानंतर १०.४५ वाजता फिजिशियन विभागास भेट दिली असता येथील डाॅक्टरही राऊंडला गेले आहेत.  राऊंड संपला की येणार आहेत, असे सांगण्यात आले. मात्र विभागात तपासले तर तेथेही कोणीच नव्हते. दिलेल्या वेळेत केबीनला उपस्थित रहायला  पाहिजे आहे. जर डाॅक्टर जागेवर राहत नसतील तर रुग्णांची काळजी कोण घेत असेल? असा प्रश्न पडणे  सहाजिजकच आहे.  शासकीय रुग्णालयात वर्ग १ ची १८ पदे असून त्यापैकी ७ भरलेली आहेत तर ११ रिक्त आहेत.  तसेच वर्ग २ ची ३५ मंजूर पदे असून ही सर्व भरलेली आहेत. वर्ग ३ मध्ये २२७ पदे असून १०० भरलेली आहेत. तर १२७  रिक्त आहेत. वर्ग ४ ची १४१ पदे असून ४३ भरलेली आहेत. तर ९८ पदे रिक्त आहेत. एकूण ४२१ पदांपैकी १८५ पदे भरलेली असून २३६ पदे रिक्त आहेत.

सरकारी दवाखान्यातील अस्थिरोग, सर्जन, फिजिशियन, बालरोग आणि स्त्रीरोग या विभागातील डाॅक्टरांना रुग्णांच्या सेवेकरीता वेळेवर हजर राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. ज्या-त्या विभागात हजर राहत नसतील तर  त्या संदर्भात कडक कारवाई केली जाईल.- डॉ. राजेंद्र  सूर्यवंशी,जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :doctorडॉक्टरHingoliहिंगोली