शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पिताय ना; मग काळजी घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:36 IST

हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. अतिवृष्टीमुळे विविध भागातील जलस्त्रोतांनाही सध्या दूषित पाणी येत असल्याचे दिसत ...

हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. अतिवृष्टीमुळे विविध भागातील जलस्त्रोतांनाही सध्या दूषित पाणी येत असल्याचे दिसत आहे. एवढेच काय तर पालिकेकडून पुरवठा होणारे पाणीही गढूळ असल्यासारखे दिसत आहे. धरणात येणाऱ्या पुराच्या पाण्याचा रंग त्यालाही दिसत आहे. जलशुद्धीकरण केंद्रातून आलेले हे पाणीही पिवळसर रंगाचे असल्याने ते मातीमिश्रित असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचे क्लोरिनेशन झालेले असले तरीही उकळून प्यायल्यास इतर आजारांचा धोका टळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काही काळ पाणी उकळून प्यायल्यास दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव करता येणे शक्य आहे. ग्रामपंचायतींनीही पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे शुद्धीकरण करावे. हातपंपांच्या आजूबाजूला घाण, उकीरडा साठू देऊ नये. परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन करण्यात आले.

दूषित पाण्यामुळे होणारे आजार

दूषित पाण्यामुळे टायफॉईड, कावीळ, अतिसार,

कावीळ झाल्यास ताप येणे, पोट दुखणे, मळमळ होणे, भूक मंदावणे अशी लक्षणे दिसतात.

हळूहळू आजार वाढत गेल्यास डोळ्यात पिवळेपण दिसते.

अतिसारात तर पोटदुखी, जुलाब, उलटी ही सामान्य लक्षणे दिसून येतात.

टायफॉईडमध्ये एक किंवा दोन दिवसाआड ताप येतो, भूक मंदावणे, अशक्तपणा येणे, अशी लक्षणे दिसून येतात.

सध्या अतिवृष्टीमुळे दूषित पाणी पिण्यात येऊ शकते. त्यामुळे ते उकळून व गाळून प्यावे. शक्यतो उघड्यावरील पदार्थ खाऊ नयेत, शिळे अन्न खाऊ नये, जेवणापूर्वी व शौचानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत, अशी माहिती जिल्हा साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ.गणेश जोगदंड यांनी दिली.

शहराला रोज चार ते आठ एमएलडी पाणीपुरवठा होतो. यात विविध भागातील ८ टाक्यांवरून शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. तसा टाक्यांपर्यंत रोज आठ ते दहा एमएलडीचा पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केलेले असते. याशिवाय खासगी स्त्रोतांतूनही नागरिक पाणी उपसा करून त्याचा वापर करतात. काही भागात फिल्टरचे पाणीही नागरिक घेतात. एका नागरिकास दिवसाकाठी पिण्यास पाच ते सात लिटर पाणी लागते.