शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

१७ हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:31 IST

हिंगोली: येलदरी धरणातील पाणी व धरणाच्या वरील ११ गावांत पडलेल्या पावसामुळे सिद्धेश्वर धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे गुरुवारी ...

हिंगोली: येलदरी धरणातील पाणी व धरणाच्या वरील ११ गावांत पडलेल्या पावसामुळे सिद्धेश्वर धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे गुरुवारी ४ धरणाचे बाराही दरवाजे ४ फुटांनी उघडले होते. शुक्रवारी २ फुटाने उघडले. १७ हजार क्युसेसने २४ सप्टेंबर रोजी धरणातील पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात करण्यास सुरुवात करण्यात आला.

२० सप्टेंबरपासून सिद्धेश्वर धरणाच्या वरती असलेलेल्या ११ गावांमध्ये पाऊस चांगलाच पडत आहे. पहिल्या दिवशी ६ दरवाजे २ फुटाने तर ६ दरवाजे ३ फुटाने उघडले होते. दुसऱ्या दिवशी १२ दरवाजे ३ फुटाने तर तिसऱ्या दिवशी १२ दरवाजे ४ फुटाने उघडले आहेत. चौथ्या दिवशी बारा दरवाजे परत दोन फुटाने उघडले. सद्य:स्थितीत धरणातील पाणीसाठा २५६.८०४ दलघमी असून जिवंत पाणीसाठा ८०.९६ दलघमी एवढा आहे. मागच्या तीन दिवसांपासून चिंचखेडा, हिवरखेडा, घडोळी, आमदरी, लिंबाळा, कोल्डेगाव, तांदूळवाडी, बोडका, ब्राह्मणवाडी, डिग्रस आदी ११ गावांमध्ये पावसाचे प्रमाण चांगले झाल्याने सिद्धेश्वर धरणात पाण्याचा येवा वाढला आहे.

पाण्याचा येवा धरणात जास्त झाल्यामुळे धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे पूर्णा नदीखालील २२ गावांना चौथ्या दिवशीही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणातील पाण्याचा येवा लक्षात घेता पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

-भूषण कनोज, उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे विभाग