शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

गावात सिमेंट रस्त्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:56 IST

रस्त्यावर घाण पाणी हिंगोली : शहरातील जिजामाता नगरातून गायत्री शक्तीपीठकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे. या खड्ड्यात नळयोजनेचे ...

रस्त्यावर घाण पाणी

हिंगोली : शहरातील जिजामाता नगरातून गायत्री शक्तीपीठकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे. या खड्ड्यात नळयोजनेचे पाणी साचत असल्याने या भागातील नागरिकांना व वाहनचालकांना रस्त्यावरून ये-जा करताना अडथळा निर्माण होत आहे. तसेच खड्डयांतील पाणी खूप दिवसांपासून साचले आहे.

गतिरोधक बसविण्याची मागणी

खुडज : सेनगाव तालुक्यातील खुडज गावापासून सेनगावकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. हा रस्ता नव्याने केल्याने अनेक वाहने येथून भरधाव वेगाने धावत आहेत. वाहने वेगाने धावत असल्याने याठिकाणी अनेकदा अपघात होत आहेत. यासाठी या रस्त्यावर गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

वानरांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त

सवना : सेनगाव तालुक्यातील सवना, वायचाळ पिंपरी, ब्राह्मणवाडा आदी परिसरात काही दिवसांपासून वानरांनी उच्छाद मांडला आहे. घरावरील कौलांवरून वानरे उड्या मारत आहेत. तसेच अंगणात ठेवलेल्या वस्तूंची नासाडी करीत आहेत. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

वृक्ष लागवडीची गरज

हिंगोली : जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाभरात वृक्षारोपण करण्याचा प्रयत्न केला जातो. दरवर्षी वृक्षलागवड मोहीम हाती घेण्यात येते. मात्र, वृक्ष लागवडीनंतर यातील बहुतांश रोपटी वाळून जात आहेत. तसेच वृक्षतोडही होत असल्याने झाडांची संख्या कमी होत आहे.

पुलाचे कठडे गायब

हिंगोली : हिंगोली ते कळमनुरी मार्गावरील काही पुलाचे कठडे गायब झाले आहेत. या मार्गावरून पहिल्यांदाच प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना पुलाचा अंदाज येत नसल्याने धोका निर्माण होत आहे. पुलाचे लोखंडी कठडे गायब करणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

पाणीटंचाईच्या जाणवताहेत झळा

हिंगोली : तालुक्यातील अनेक गावांतील जमिनीतील पाण्याची पातळी खालावत आहे. पाणीसाठे आटत चालल्याने पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. सध्या थंडीचे दिवस आहे. आतापासूनच पाणीटंचाई जाणवत असल्याने ग्रामस्थांची भटकंती वाढली आहे.

सौरदिवे बनले शोभेची वस्तू

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्यावतीने अनेक ग्रामपंचायतींमध्ये सौरदिवे बसविण्यात आले होते. मात्र, काही दिवसांतच सौर दिवे बंद पडत आहेत. बॅटऱ्याही चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे या योजनेचा कोणताही लाभ गावकऱ्यांना होत नसल्याचा आरोप गावकरी करीत आहेत.

दुभाजकाची मागणी

कळमनुरी : शहरातील डॉ. शंकरराव सातव महाविद्यालय ते बसस्थानक दरम्यान वाहनांची नेहमी वर्दळ असते. अनेक वेळा वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. तसेच आठवडी बाजाराच्या दिवशी तर पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. त्यामुळे या मार्गावर दुभाजक बसविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

गिरगाव ते वसमत रस्त्याची दुरवस्था

वसमत : येथून गिरगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना आपले वाहन चालवितांना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच अनेकदा खड्डे चुकविण्याच्या नादात अनेक दुचाकीस्वरांचा अपघातही घडत आहे. तसेच वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. यासाठी हा रस्ता दुरुस्त करावी, अशी मागणी होते.