शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाखांच्या लाचेची मागणी; हिंगोली तहसीलदारांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:22 IST

याबाबत २५ मे २०२१ रोजी अजय सुदामराव नागरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल झाली होती. नागरेंनी भाड्याने घेतलेले ...

याबाबत २५ मे २०२१ रोजी अजय सुदामराव नागरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल झाली होती. नागरेंनी भाड्याने घेतलेले पाच टिप्पर मागील वीस ते पंचवीस दिवसांपूर्वी वाळूची वाहतूक करताना हिंगोली पोलिसांनी पकडले होते. ते हिंगोली पोलीस ठाण्यात लावून याबाबत तहसीलदारांकडे पत्रक पाठवित पुढील कार्यवाहीबाबत कळविण्यात आले होते. त्यावरून नागरेंनी तहसीलदारांची भेट घेतल्याचे तक्रारीत म्हटले. तेव्हा पकडलेल्या पाचही टिप्परवर लवकर कार्यवाही करून ते लवकर सोडविण्यासाठी व मागील महिन्याचे वाळूचे टिप्परवर कार्यवाही न करण्यासाठी राहिलेली रक्कम असे मिळून ३ लाखांच्या लाचेची मागणी करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले होते. यावरून २५ मे रोजी या तक्रारीची पडताळणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आली. त्यात तहसीलदारांनी ३ लाखांची लाच स्वीकारण्याची सहमती दर्शविली असल्याचे म्हटले आहे. यावरून तहसीलदार पांडुरंग माचेवाडविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच पुढील कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधकचे उपाधीक्षक नीलेश सुरडकर, कर्मचारी विजय उपरे, तान्हाजी मुंढे, विनोद देशमुख, ज्ञानेश्वर पंचलिंगे, अविनाश कीर्तनकार, प्रमोद थोरात, सरनाईक आदींनी यशस्वी पार पाडली.

उलटसुलट चर्चांना उधाण

या प्रकरणात तक्रार दिल्याच्या दिवशीच पडताळणीही झाली. मात्र, त्याबाबत तक्रार दाखल करण्यास विलंब का झाला, हे कळायला मार्ग नाही. यावरून उलटसुलट चर्चांना उधाण येत आहे. शिवाय यामागे राजकीय शक्ती असल्याच्याही चर्चा होत आहेत. याबाबत उपअधीक्षक सुरडकर यांना विचारले असता ते म्हणाले, तक्रारदार २६ रोजी तहसीलदारांना रक्कम नेऊन देणार होता. मात्र, नंतर त्याने माघार घेतली. मात्र, पुढील पडताळणीत सर्व बाबी आढळल्याने लाचलुचपत प्रतिबंधकतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे याला विलंब झाला.