शनिवारी शहरातील म.गांधी पुतळ्यानजीकच्या होर्डिंग्जबाबत तक्रार झाल्यानंतर ते हटविले होते. मात्र, नंतर अग्रसेन महाराज पुतळाही होर्डिंग्जनी झाकल्याच्या तक्रारीनंतर तेथील होर्डिंग्जही हटविल्या. मुख्याधिकारी डाॅ.अजय कुरवाडे, बाळू बांगर, चंदू लव्हाळे आदींची उपस्थिती होती. यावेळी शहरात होर्डिंग्ज लावणाऱ्यांना बोलावून घेण्यात आले होते, तर त्यांनी नागरिकांना त्रासदायक होणार नाहीत, अशा ठिकाणी होर्डिंग लावण्यास मुख्याधिकाऱ्यांनी बजावले. शहरात अशी निवडक ठिकाणे शोधून त्या ठिकाणी ठरावीक आकाराच्या होर्डिंग्ज लावता येतील. अनावश्यक कितीही मोठ्या आकाराच्या होर्डिंग्ज लावल्यास लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी तंबी देण्यात आली. शहरात अशी पंधरा ते वीस ठिकाणे निश्चित करून, त्या ठिकाणी होर्डिंग लटकविण्यासाठीचे स्टँडही पालिका बनविणार आहे. या व्यतिरिक्तच्या ठिकाणी नवे होर्डिंग लागले, तर ते जप्त करण्यात येणार असल्याचेही कुरवाडे यांनी सांगितले, तर महापुरुषांच्या पुतळ्यांच्या ठिकाणी लावल्यास थेट गुन्हे दाखल करू, असा इशाराही त्यांनी दिला.
अनधिकृत होर्डिंग्ज लावल्यास गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:20 IST